Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: चिंबल येथे थरार! पोलिसांचा पाठलाग अखेर बेतला जीवावर

टॅक्सीमालकाचा अपघाती मृत्यू; दोघांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident चिंबल जंक्शनवर वाहन पार्किंगवरून झालेल्या भांडणानंतर पोलिसासह अन्य एकाने पाठलाग केल्याने टॅक्सीमालक जयेश चोडणकर याला रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाची धडक बसली. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी कृपेश वळवईकर (बिठ्ठोण) तसेच आयआरबीचा पोलिस प्रीतेश हडकोणकर या दोघांना अटक केली. या घटनेनंतर स्थानिकांत संतापाची लाट उसळली आहे.

चिंबल येथे बुधवारी रात्री 8 च्या सुमारास जयेश (वय 42 वर्षे) हा आपली टॅक्सी पार्क करत होता. मात्र, नेहमी या जागेवर एक खासगी बस उभी करून ठेवली जाते. त्यामुळे जयेश आणि बसमालकाचा वाहन पार्क करण्यावरून वाद झाला. हे दोघेही एकमेकांना ओळखत असल्याने वाद संपल्यानंतर बसचालक व त्याच्या नातेवाईकाने जयेशला बोलावून माफी मागण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला.

यावेळी जयेशला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर जयेश रस्त्यावरून मेरशी सर्कलच्या दिशेने धावू लागला, तेव्हा त्याचा पाठलाग करण्यात आला.

जीव वाचवण्यासाठी जयेश धावत असताना समोरून येणाऱ्या वाहनाची धडक त्याला बसली. त्याच्या पायावरून वाहन गेल्याने तो गंभीर जखमी झाला. एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला गोमेकॉत दाखल केले. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला.

ठोकरलेल्या ‘त्या’ वाहनाचा शोध सुरू

याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी कृपेश वळवईकर आणि ‘आयआरबी’चा पोलिस प्रीतेश हडकोणकर यांना ताब्यात घेतले. जयेशचा पाठलाग केल्यानेच तो जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावला. त्यातच त्याला अपघात झाला, असे पोलिसांचे म्हणणे असून ज्या वाहनाची धडक बसली, त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन गुन्हे दाखल : जुने गोवे पोलिसांनी मारहाण तसेच अज्ञात वाहनाने धडक दिल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. मारहाणप्रकरणी पोलिसासह दोघांना अटक केली आहे.

जयेशला वाहनाची धडक बसली, तेव्हा मेरशी सर्कलवरून तीन वाहने गेली. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेराच्या साहाय्याने या तिन्ही वाहनांचा शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT