Goa Child Health Dainik Gomantak
गोवा

Goa Child Health: गोव्यातील बालकांचे आरोग्य धोक्यात, कुपोषण आणि वाढ खुंटल्याने वाढली चिंता; मुलांमध्‍ये फोफावतोय ‘ॲनिमिया’

Goa Child Malnutrition: राज्‍यात पाच वर्षांखालील २५.८ टक्‍के मुलांची वाढ खुंटत आहे, १९.१ टक्‍के मुलांमध्‍ये कुपोषणाची लक्षणे दिसत आहेत.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍यात पाच वर्षांखालील २५.८ टक्‍के मुलांची वाढ खुंटत आहे, १९.१ टक्‍के मुलांमध्‍ये कुपोषणाची लक्षणे दिसत आहेत. तर २.८ टक्‍के मुलांचे वजन त्‍यांच्‍या वयापेक्षा जास्‍त असल्‍याचे केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातील आकडेवारीतून समोर आले आहे.

गोव्‍यासह (Goa) देशभरात पाच वर्षांखालील मुलांमध्‍ये वाढ खुंटणे तसेच लठ्ठपणाच्‍या समस्‍या जाणवत आहेत. या वयातील मुलांची वाढ खुंटण्‍याची राष्‍ट्रीय सरासरी ३५.५ टक्‍के आहे. त्‍या तुलनेत गोव्‍यात हे प्रमाण २५.८ टक्‍के इतके आहे. तर, वयापेक्षा वजन जास्‍त असल्‍याची राष्‍ट्रीय सरासरी ३.४ टक्‍के इतकी असून, राज्‍यात हे प्रमाण २.८ टक्‍के इतके असल्‍याचे या आकडेवारीतून दिसून येते.

दरम्‍यान, लहान मुलांमधील कुपोषणावर नियंत्रणासाठी केंद्रामार्फत विविध पावले उचलली आहेत. यासाठी ‘मिशन पोषण २.०’ हे अभियानही सुरू केले असून, गरोदर माता ,बाळांना घरोघरी जाऊन शिजवलेले गरम जेवण देण्‍यात येत आहे. जागृती करण्‍यात येत आहे, असेही मंत्री पटेल यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

मुलांमध्‍ये फोफावतोय ‘ॲनिमिया’

६ ते ५९ महिने या गटातील मुलांमध्‍ये अनेमिया फोफावत असल्‍याचेही मंत्री पटेल यांनी सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून. या गटातील मुलांना ‘ॲनिमिया’ होण्‍याची राष्‍ट्रीय सरासरी ६७.१ टक्‍के आहे. त्‍या तुलनेत गोव्‍यातील ५३.२ टक्‍के मुलांना ॲनिमिया जडला आहे. दुसरीकडे १५ ते ४९ या वयोगटातील ३८.९ टक्‍के महिला (Women) आणि १२ टक्‍के पुरुषांनाही ‘ॲनिमिया’ होत असल्‍याचेही आकडेवारी सांगते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT