
Child Health Tips: हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे एक महत्त्वाचे प्रोटीन आहे. याचे मुख्य काम शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करणे आहे. जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा फुफ्फुसांमधून ऑक्सिजन ब्लडमध्ये जातो आणि हिमोग्लोबिन तो शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पोहोचवतो. यासोबतच, हिमोग्लोबिन शरीरातून कार्बन डायऑक्साइड बाहेर काढण्यासही मदत करते.
लहान मुलांच्या योग्य वाढीसाठी, ऊर्जा पातळी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी हिमोग्लोबिनचे पुरेसे प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे. जर मुलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असेल, तर त्यांच्या अवयवांना आणि मेंदूला ऑक्सिजनचा (Oxygen) पुरेसा पुरवठा होऊ शकत नाही, ज्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटू शकते.
हिमोग्लोबिनची कमतरता, ज्याला ॲनिमिया असेही म्हणतात, मुलांमध्ये अनेक समस्या निर्माण करु शकते.
थकवा आणि अशक्तपणा: शरीराच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मुलांना सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. यामुळे त्यांच्या खेळात आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.
हृदयविकार: हिमोग्लोबिनची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास हृदयाला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
कमजोर रोगप्रतिकारशक्ती: हिमोग्लोबिन कमी असल्यास मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि ते सहजपणे आजारी पडू शकतात.
शारीरिक आणि मानसिक वाढ: गंभीर ॲनिमियामुळे मुलांची वाढ आणि मेंदूचा विकास प्रभावित होऊ शकतो.
दिल्ली एमसीडीमधील डॉ. अजय कुमार यांच्या मते, 1 ते 10 वर्षांच्या मुलांमध्ये हिमोग्लोबिनची सामान्य पातळी 10 ते 15 ग्रॅम/डीएल असावी. हे प्रमाण मुलाचे वय, लिंग आणि शारीरिक हालचालींनुसार थोडे बदलू शकते.
मुलांच्या हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखण्यासाठी पालकांनी खालील गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
आहार: मुलांना संतुलित आहार द्या, ज्यात लोह (Iron), व्हिटॅमिन बी12 आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असेल. हिरव्या भाज्या, डाळी, अंडे, मांस आणि फळे यांचा आहारात समावेश करा.
नियमित तपासणी: वर्षातून किमान एकदा हिमोग्लोबिनची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. यामुळे कमतरतेचे वेळीच निदान होऊन त्यावर उपचार करणे शक्य होते.
डॉक्टरांचा सल्ला: जर चाचणीत ॲनिमियाचे निदान झाले, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोह पूरक घ्या.
जीवनशैली: मुलांना पुरेसे पाणी पाजले पाहिजे आणि त्यांना नियमित शारीरिक हालचालींसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
लक्षणांकडे लक्ष द्या: जर मुलांमध्ये सतत थकवा, अशक्तपणा किंवा एकाग्रतेचा अभाव यांसारखी लक्षणे दिसली, तर त्वरित डॉक्टरांचा (Doctors) सल्ला घ्या आणि चाचणी करुन घ्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.