Child Health: लहान मुलांमधील लठ्ठपणा धोकादायक! हृदयविकारानं वाढवली चिंता; असं मिळवा नियंत्रण

Childhood Obesity Causes And Prevention: आजकाल मुलांमध्ये लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. अनहेल्दी खानपान आणि खराब जीवनशैलीमुळे मुले वाढत्या वयात लठ्ठपणाचे शिकार ठरत आहेत.
Child Health: लहान मुलांमधील लठ्ठपणा धोकादायक! हृदयविकारानं वाढवली चिंता; असं मिळवा नियंत्रण
Childhood Obesity Dainik Gomantak
Published on
Updated on

आजकाल मुलांमध्ये लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. अनहेल्दी खानपान आणि खराब जीवनशैलीमुळे मुले वाढत्या वयात लठ्ठपणाचे शिकार ठरत आहेत, ज्यामुळे भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

केवळ वाढलेले वजनच नाहीतर शरीरात जमा होणारी अतिरिक्त चरबी देखील लठ्ठपणाच्या श्रेणीत येते. लठ्ठपणामुळे मुलांना अनेक आजारांचा धोका वाढतो. गेल्या दशकात, लठ्ठपणा ही मुलांमध्ये एक मोठी आरोग्य समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे मुलांची प्रतिकारशक्तीही कमकुवत होते. अशा परिस्थितीत लठ्ठपणावर नियंत्रण मिळवणे गरजेचे बनते.

मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढत आहे?

आजच्या काळात मुले घरी बनवलेले अन्न सोडून जंक फूड आणि प्रक्रिया केलेले खाद्यान्न पसंत करत आहेत. ज्यामुळे मुले झपाट्याने लठ्ठ होत आहेत. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये अनेक प्रकारचे आजारही वाढत आहेत. लठ्ठ मुलांमध्ये टाइप-2 मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढत आहे. काही प्रकरणांमध्ये, लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाबाची समस्या देखील उद्भवते. लठ्ठपणा देखील कमकुवत प्रतिकारशक्तीशी संबंधित आहे.

Child Health: लहान मुलांमधील लठ्ठपणा धोकादायक! हृदयविकारानं वाढवली चिंता; असं मिळवा नियंत्रण
Heart Attack: विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका; संशोधनातून खुलासा

लठ्ठपणामुळे रोगप्रतिकारक शक्ती का कमकुवत होते?

लठ्ठपणा असलेल्या मुलांमध्ये संसर्गाचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त, लठ्ठपणाशी संबंधित त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात. लठ्ठ मुलांमध्ये सोरायसिस, एटोपिक डर्माटायटीस आणि अ‍ॅलोपेशिया एरियाटा यांसारखे रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित त्वचारोग होण्याचा धोका जास्त असतो. लठ्ठपणामुळे मुलांचे चयापचय मंदावू लागते. याचा थेट परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. याशिवाय, इतर अनेक आजार देखील होऊ शकतात.

हृदयाशी संबंधित आजार

असंतुलित आहार आणि खराब जीवनशैलीमुळे मुलांमध्ये हृदयाशी संबंधित आजारही झपाट्याने वाढत आहेत. लहान वयातच मुले कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाला बळी पडत आहेत. यामुळे मुलांमध्ये हृदयविकाराचा (Heart Disease) धोका देखील वाढतो.

श्वास घेण्यास त्रास होणे

मुलांमध्ये लठ्ठपणामुळे दमा आणि श्वासोच्छवासाच्या समस्या वाढतात. वजन वाढल्याने फुफ्फुसांवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

Child Health: लहान मुलांमधील लठ्ठपणा धोकादायक! हृदयविकारानं वाढवली चिंता; असं मिळवा नियंत्रण
Heart Attack: हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी 'ही' लक्षणे दिसतात, दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

मानसिक ताण

लठ्ठपणामुळे मुलांमध्ये मानसिक ताणही (Mental Stress) वाढतो. बऱ्याच वेळा, लठ्ठपणामुळे मुलांना इतरांपेक्षा वेगळे वाटते. त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे ते लहानपणापासूनच तणावात राहतात.

सांधेदुखी

लठ्ठपणामुळे हाडे आणि सांध्यावर जास्त दबाव येतो. यामुळे मनगट, कोपर आणि गुडघा यासह सांध्यामध्ये वेदना सुरु होतात. नंतर, या वेदनांमुळे संधिवातासह इतर अनेक आजार वाढतात. त्यामुळे मुलांना बराच काळ उपचार घ्यावे लागतात.

Child Health: लहान मुलांमधील लठ्ठपणा धोकादायक! हृदयविकारानं वाढवली चिंता; असं मिळवा नियंत्रण
Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

लठ्ठपणावर नियंत्रण कसे मिळवायचे?

  • मुलांनी जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न आणि खूप गोड पदार्थ खाणे टाळावे.

  • बाहेरचे अन्न खाण्याऐवजी मुलांनी नेहमीच पौष्टिक आणि संतुलित घरगुती आहार घ्यावा.

  • हिरव्या भाज्या, फळे, डाळींचे सेवन करावे.

  • मुले त्यांच्या आहारात कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करुन लठ्ठपणा नियंत्रित करु शकतात.

  • अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, स्क्रीन टाइममुळे लठ्ठपणा वाढतो. म्हणून, मुलांनी टीव्ही आणि मोबाईल टॅब्लेटवर जास्त वेळ घालवू नये.

  • मुलांनी दररोज 1 तास खेळावे किंवा शारीरिक हालचाल करावी.

  • मुलांनी दररोज 8-10 तास झोप घेतली पाहिजे. पुरेशी झोप शरीराचे वजन संतुलित ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com