Tuyem Water Treatment Plant : मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यात येणार असून तुये आयटीआय परिसरात ३० एमएलडी पाणी प्रकल्पाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर दिली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत हे तुये हॉस्पिटल उद्घाटन समारंभाला आले होते. त्यावेळी त्यांनी तुयेतील पाणी प्रकल्पाची आमदार जीत आरोलकरांसोबत पाहणी केली. यावेळी आरोलकर म्हणाले, मांद्रे मतदारसंघातील पाण्याची समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी आपले प्रयत्न आमदार झाल्यानंतर झाले.
आता तुये आयटीआय परिसरात ३० एमएलडी पाणी प्रकल्प युद्धपातळीवर काम सुरू आहे. मार्च महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मांद्रेवासीयांना किमान १२ तास नियमित पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी गावागावात पाण्याच्या टाक्याही उभारण्याचे काम सुरू झालेले आहे.
आमदार आरोलकर पुढे म्हणाले, मांद्रे मतदारसंघाचा झपाट्याने विकास व्हायला हवा. मतदारसंघात विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बदल होण्याची गरज आह. हा विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सहकार्य आहे.
तुये हॉस्पिटल गोमेका हॉस्पिटलला लिंक झाल्यानंतर अनेक आरोग्याच्या समस्या सुटणार आहे. मतदारसंघातच चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आपला पाठपुरावा चालूच राहील.
रवींद्र भवन होणार!
मांद्रे मतदारसंघात रवींद्र भवनाची पायाभरणी करण्यात येणार आहे. तसेच एक्वेरियम प्रकल्प, क्रीडा मैदान असे प्रकल्पही मार्गी लावले जाणार आहे. प्राधान्य क्रमाने तुये येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सिटीकडे लिंक रस्ता आवश्यक आहे.
तो रस्ता झाल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या या इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये दाखल होणार आहेत. त्यातून हजारो सुशिक्षित युवा-युवतींना चांगल्या पगाराच्या संधी मिळतील. त्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे आमदार जीत आरोलकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.