CM Pramod Sawant | Smart City Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: अखेर मुख्यमंत्र्यांनीच सांगितले; 'या' तारखेपर्यंत पुर्ण होणार पणजीतील स्मार्ट सिटीची कामे

मंत्री नीलेश काब्राल, महापौरांसमवेत केली कामांची पाहणी

Akshay Nirmale, दैनिक गोमन्तक डिजिटल

CM Pramod Sawant on smart city work in Panjim: पावसाळा तोंडावर आला असताना राजधानी पणजीतील ‘स्मार्ट सिटी’ची कामे अद्यापही बाकी आहेत. अवकाळी पाऊस कधीही पडू शकतो. अशा स्थितीत ही कामे तातडीने व्हावीत यासाठी नागरिकांकडून दबाव वाढला आहे.

यावर आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही कामे महिनाभरात पूर्ण केली जातील, अशी ग्‍वाही दिली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी आज महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह विविध खात्यांच्या प्रमुखांना घेत संपूर्ण स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेतला. पणजीचे आमदार आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनीसुद्धा ही कामे तातडीने पूर्ण होतील, असे आज स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत राजधानी पणजीची निवड झाली आहे. त्‍याअंतर्गत ही कामे सुरू आहेत. त्‍यात राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याबरोबर जलस्रोत, मलनि:सारण, वीज यासह अनेक खाती सक्रिय आहेत. विविध खात्यांची कामे एकत्रित सुरू आहेत.

मात्र ती संथगतीने सुरू असून त्‍यास अपेक्षित गती मिळत नाहीय. आता मान्सून तोंडावर आलेला असताना ही कामे तातडीने पूर्ण करण्‍यासाठी नागरिकांकडून दबाव वाढत आहे. त्‍यामुळेच आज मुख्‍यमंत्री सावंत यांना वरील ग्‍वाही द्यावी लागली.

मुख्‍यमंत्र्यांकडून सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना सूचना

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांना या संपूर्ण कामांचा आढावा घेण्याची सूचना केली. त्यानुसार काब्राल यांनी महापौरांसमवेत संपूर्ण कामांचा आढावा घेतला. आता या कामांना गती आली येणार आहे.

त्‍यामुळे ती 1 जूनपूर्वी पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न असेल. तसा आदेश संबंधित कंपन्‍या आणि कंत्राटदारांना देण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT