Karnataka Election 2023: गोव्यातील बसेसचे कर्नाटकात काय काम? काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

बनावट मतदानासाठी लोक, अवैध रोकड आणल्याचा संशय
KTC Buses
KTC Buses Dainik Gomantak

Karnataka Election 2023: कर्नाटकातील जे मतदार गोव्यात काम करत आहेत, त्यांना गोवा सरकारने पगारी रजा मंजुरी केली आहे. त्यावरून गोव्यात वाद सुरू असतानाच आता गोव्यातील बसेस ऐन निवडणूक काळात कर्नाटकात काय करत आहेत, असा सवाल कर्नाटक काँग्रेसकडून उपस्थित केला जात आहे.

या बसेसबाबत काँग्रेस सतर्क झाली असून याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

KTC Buses
Chicalim Theft: गोव्यात 'एनआरआय'च्या बंगल्यात घरफोडी; 500 पाऊंड्ससह 25 हजाराची रोकड लंपास

काँग्रेसचे केंद्रीय नेते पवन खेरा यांनी याबाबत ट्विट केले आहे. तेच ट्विट रणदीप सुरजेवाला यांनीही रिट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, 'गोवा भाजप गोव्यातून लोकांना कदंब परिवहन महामंडळाच्या बसमध्ये भरून उत्तर कर्नाटकात का पाठवत आहे?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज, १० मे रोजी मतदान होत आहे. दरम्यान, गोव्यातून अनेक बस उत्तर कर्नाटकात जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या बसमधून अवैध पैसे आणले जात आहेत की बनावट मतदानाची तयारी केली जात आहे, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

गोवा भाजप कदंब परिवहन महामंडळाच्या बसमधून गोव्यातून उत्तर कर्नाटकात लोकांना का पाठवत आहे? गेल्या आठवड्यातही पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी 100 हून अधिक बसेस भरून लोकांना कर्नाटकात आणले होते.

KTC Buses
EDC Goa Dividend: 'ईडीसी'कडून गोवा सरकारला लाभांश म्हणून मिळाले 'इतके' कोटी रूपये

यातून अवैध पैसा आणला जात आहे का? कर्नाटक पोलीस काय करत आहेत? दांडेली येथील व्हिसलिंग वुड्स जंगल रिसॉर्टमध्ये नेमके काय चालले आहे? विश्वजीत राणेंनी येथे सहा खोल्या बुक केल्या आहेत का? त्याचा उद्देश काय आहे? यावर निवडणूक आयोग काही कारवाई करणार का? असे सवाल काँग्रेसने केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com