EDC Goa Dividend: 'ईडीसी'कडून गोवा सरकारला लाभांश म्हणून मिळाले 'इतके' कोटी रूपये

चेअरमन सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे धनादेश केला सुपुर्द
EDC Goa Dividend 2023
EDC Goa Dividend 2023 Dainik Gomantak

EDC Goa Dividend 2023: गोव्यातील महत्वाची आर्थिक संस्था असलेल्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने गोवा सरकारला लाभांशाचा धनादेश सुपुर्द केला आहे.

महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे हा धनादेश सुपुर्द केला. सुमारे २ कोटी रूपयांहून अधिक लाभांश यंदा गोवा सरकारला दिला आहे.

EDC Goa Dividend 2023
Chicalim Theft: गोव्यात 'एनआरआय'च्या बंगल्यात घरफोडी; 500 पाऊंड्ससह 25 हजाराची रोकड लंपास

2 कोटी 79 लाख 75 हजार 853 रूपये लाभांशाचा धनादेश गोवा सरकारला देण्यात आला. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवा, दमण आणि दिव ही संस्था 12 मार्च 1975 रोजी स्थापन झाली होती.

गोव्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात या संस्थेने गेल्या ४५ वर्षात मोठी कामगिरी बजावली आहे.

ईडीसीने औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील अनेक प्रकल्पांना अर्थपुरवठा केला आहे. सध्या मुख्यमंत्री रोजगार योजना देखील ईडीसीकडून राबवली जात आहे.

दरम्यान, ईडीसीने यशस्वी कार्यान्वयन आणि नफ्याासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महामंडळाचे अभिनंदन केले आहे. भविष्यातही ही संस्था अशीच कार्यरत राहिल आणि लाभांश देत राहिल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com