Shivaji Maharaj statue desecration Goa Dainik Gomantak
गोवा

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; आरोप निश्चित करण्याचे म्हापसा कोर्टाचे आदेश

Goa Shivaji statue case: आरोपी नायगेल फॉन्सेका याच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत.

Pramod Yadav

म्हापसा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी तीन आरोपींपैकी एकाविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश म्हापसा कोर्टाने दिले आहे. पुतळ्याची मोडतोड करुन सार्वजनिक भावना दुखावल्याबद्दल आरोप निश्चित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. २०२३ मध्ये आयडीसी करसवाडा येथे शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

आरोपी नायगेल फॉन्सेका याच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत. प्रथमदर्शनी त्यानेच गुन्हा केल्याचे दर्शवणारे पुरेसे पुरावे त्याच्याविरोधात असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. तर, आलेक्स फर्नांडिस आणि लॉरेन्स मेंडीस यांना दोषी ठरवणारे पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आलीय.

आलेक्स फर्नांडिस आणि लॉरेन्स मेंडीस यांचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. करसवाडा येथील शिवरायांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याचा आरोप तिघांविरोधात होता.

याप्रकरणी चंदन कुमार या प्रत्यक्षदर्शीने कोर्टात जबानी दिली होती. कोर्टाने कुमार यांची जबानी विचारात घेतली. चंदन कुमार यांनी न्यायालयात सांगितले की, तिघे संशयित वडाच्या झाडाखाली बसले होते. तिघांनीही मद्य प्राशन केले होते. तिघांनी कुमार यांना शिवीगाळ केली आणि प्रार्थना करताना शिवरायांच्या पुतळ्याच्या दिशेने दगड भिरकावला. 

आरोपी नायगेल फॉन्सेका याने पुतळ्याच्या दिशेने दगड भिरकावला त्यात पुतळ्याचे नुकसान झाले, अशी जबानी कुमार यांनी दिली. तिघेही दारुच्या नशेत असले तरी फॉन्सेका यानेच पुतळ्यावर दगड मारल्याचे कुमार यांनी सांगितले. दरम्यान, आरोप निश्चितीनंतर आरोपी फॉन्सेका यांना काय शिक्षा जाहीर केली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT