Chain Snatching: चोरट्यांचा धुमाकूळ! वृद्ध महिलेची 2 लाखांची चेन हिसकावली; नावेलीतील तिसरी घटना, परप्रांतीय टोळी असल्याचा संशय

Navelim chain snatching: उपनिरीक्षक शुभम गावकर पुढील तपास करीत आहेत. दिवसाढवळ्या ही घटना घडली. यापूर्वीही या भागात वृद्ध महिलांना हेरून सोनसाखळी हिसकाविण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
Chain Snatching | Goa Crime
Chain Snatching | Goa Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नावेली येथे चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेसाठी जात असताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्यांनी पळ काढला, चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत साधारणता दोन लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

उपनिरीक्षक शुभम गावकर पुढील तपास करीत आहेत. दिवसाढवळ्या ही घटना घडली. यापूर्वीही या भागात वृद्ध महिलांना हेरून सोनसाखळी हिसकाविण्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा वाढत्या चोरीमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फ्रान्सिका गोन्साल्विस या ६९ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पोबारा केला. पहाटे सव्वा सहाच्या दरम्यान चोरीची ही घटना घडली. दुचाकी चालविणाऱ्याने हेल्मेट व काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. तर पाठीमागे बसलेल्याने हिरव्या रंगाचे जॅकेट घातले होते.

Chain Snatching | Goa Crime
Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

दुचाकीला नंबरप्लेटही नव्हती. या चोरटयांनी चालत जाणाऱ्या फ्रान्सिका गोन्साल्विस यांना मागाहून धक्का दिला होता. यासंदर्भात, मडगाव पोलिसांशी संपर्क साधला असता, परप्रांतीय टोळीचा या चोरी प्रकरणात हात असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बेळगाव येथे गेल्या आठवड्यात अशाच घटना घडलेल्या आहेत. ती टोळी आता गोव्यात सक्रीय झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Chain Snatching | Goa Crime
Mapusa Theft: बंगल्यात घुसून सशस्त्र दरोडा, 35 लाख लुटले! गोवा पोलिसांची पथके बंगाल, हैदराबाद, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मुंबईमध्ये दाखल

घटना वाढल्याने चिंता

या भागात यापूर्वीही अशा घटनांची नोंद झालेली आहे. १० ऑक्टोबर रोजी इनोसेंट गोम्स (६१) या जेष्ठ महिलेची चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असताना एक लाख २० हजार रुपये किंमतीची सोसाखळी चोरून नेली होती. तसेच मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या ७४ वर्षीय वृद्धेची सोनसाखळी चोरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com