goa challenges in restoring margaos historic camara municipal de salcete Dainik Gomantak
गोवा

Camara Municipal De Salcete: 120 वर्षांचा इतिहास असलेली ‘काम्र द सालसेत’ मोडकळीस; इमारतीच्या संवर्धनाची होतेय मागणी

120 वर्षांचा इतिहास असलेली मडगावची जुनी नगरपालिका इमारतही त्‍याच वाटेवर तर नाही ना? अशी भीती वारसाप्रेमींना वाटू लागली आहे.

Manish Jadhav

मुसळधार पावसामुळे तग न धरु शकल्‍याने गोव्‍याचे सुपुत्र आणि राष्‍ट्रवादी बाण्‍याचे संसदपटू म्‍हणून प्रसिद्ध असलेले डॉ. फ्रान्सिस्क लुईस गोम्स यांच्‍या नावेली येथील घराची पडझड झालेली असतानाच सुमारे 120 वर्षांचा इतिहास असलेली मडगावची जुनी नगरपालिका इमारतही त्‍याच वाटेवर तर नाही ना? अशी भीती वारसाप्रेमींना वाटू लागली आहे.

दरम्यान, ‘काम्र द सालसेत’ या नावाने एकेकाळी प्रसिद्ध असलेली आणि संपूर्ण सासष्टी आणि मडगाव तालुक्‍याचा प्रशासकीय कारभार हाताळणाऱ्या या इमारतीचे संवर्धन करावे अशी मागणी नागरिकांनी केली होती.

मात्र ही इमारत खाजगी मालकीची असल्याचा मुद्दा पुढे करुन या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्ष करण्‍यात आल्‍याने यावर्षी पडलेल्‍या मुसळधार पावसात ही इमारतही जमीनदोस्‍त होणार तर नाही ना अशी भीती वाटू लागली आहे.

सुमारे 120 वर्षांपूर्वी मडगावची नगरपालिका शहराच्या मध्यमागी असलेल्‍या विद्यमान पालिका इमारतीत स्थलांतरित करण्‍यात आली. मात्र त्‍यापूर्वी कित्‍येक वर्षे मडगावच्‍या जुन्‍या मार्केटमध्ये असलेल्‍या याच इमारतीत नगरपालिकेची सत्ता चालायची.

तेव्हापासून नागरिक या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्‍न केले होते. सध्‍या या ऐतिहासिक इमारतीवर नजर टाकल्यास ही जुनी वास्तू जीर्णावस्थेत आल्याचे दिसून येते. या इमारतीच्‍या काही भिंती ढासळल्या असून भिंतीवर छोट्या-छोट्या वेली दिसतायेत.

यापूर्वी, मडगाव नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही इमारत असुरक्षित असल्‍याचे कारण देऊन ती पाडण्याची योजना आखली होती. मात्र त्‍यावेळी इतिहासकार प्रा. प्रज्वल साखरदांडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी या इमारतीच्या संवर्धनाचा आग्रह धरुन ही कारवाई थांबवली होती.

सुमारे 15 वर्षांपूर्वी मडगाव नगरपालिकेने ही 'काम्रा द सासष्टी' इमारत आणि डॉ फ्रान्सिस्क लुईस गोम्स यांचे वडिलोपार्जित घर असलेल्या मालमत्तांचे संग्रहालयात रुपांतर करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला होता.

तथापि, भूसंपादन प्रक्रियेत निधीची कमतरता तसेच या वारसा वास्तूचे पुनर्वसन करण्याच्या अधिकारांच्या अभावामुळे त्‍यात अडथळा निर्माण झाला होता. आता डॉ. गोम्‍स यांचे घराचा एक भाग कोसळल्‍यानंतर निदान नगरपालिकेची ही जुनी इमारत सांभाळून ठेवावी या मागणीने पुन्‍हा एकदा जोर धरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT