William Fernandes
William FernandesDainik Gomantak

Goa News : रोमीला राजभाषा दर्जा देणे पर्रीकरांना होते मान्‍य : विलियम फर्नांडिस

William Fernandes : काँग्रेसच्या ख्रिस्ती आमदारांचे मागणीकडे दुर्लक्ष
Published on

मडगाव, देवनागरी लिपीतील कोकणीला जसा राजभाषेचा दर्जा मिळाला तसाच समान दर्जा रोमी लिपीतील कोकणीलाही मिळावा अशी रोमी समर्थकांची मागणी होती आणि महत्त्वाचे म्‍हणजे माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही ही मागणी मान्‍य होती, असा दावा दाल्‍गाद कोकणी अकादमीचे उपाध्‍यक्ष विलियम फर्नांडिस यांनी केला.

कोकणीचा वापर करून अनेक ख्रिस्‍ती आमदार जिंकून आले. मात्र, एक कायतान सिल्‍वा सोडल्‍यास अन्‍य कुणालाही रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळावा म्‍हणून खासगी विधेयकही मांडता आले नाही, असेही ते म्हणाले.

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या लोकप्रिय कार्यक्रमात फर्नांडिस यांनी हा दावा केला. ‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी त्‍यांची ही मुलाखत घेतली असून ही मुलाखत ‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या यू-ट्यूब, फेसबुक आणि इन्‍स्‍टाग्रामवर प्रसारित करण्यात आली आहे.

फर्नांडिस म्‍हणाले, राजभाषा आंदोलनात कोकणीसाठी गोव्‍यातील ख्रिस्‍ती समाज हिरिरीने सहभागी झाला होता. त्‍यावेळी त्‍यांना फक्‍त देवनागरी लिपीतील कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळणार हे माहीत नव्‍हते.

William Fernandes
Goa Weather Update: गोव्यासाठी धोक्याचा इशारा; ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही मुसळधार पाऊस

ज्‍यावेळी रोमीला डावलले गेले त्‍यावेळी हा घटक निराश झाला. रोमीला राजभाषेचा दर्जा मिळावा ही मागणी त्‍यावेळेपासून सुरू झाली होती. मात्र, दुर्दैवाने काँग्रेसच्या ख्रिस्‍ती आमदारांनी या मागणीकडे दुर्लक्षच केले.

कोकणीच्या नावावर कित्‍येकजण आमदार झाले. मात्र, एकालाही राजभाषा कायद्यात बदल करावा यासाठी विधेयक आणावे असे वाटले नाही. फक्‍त कायतान सिल्‍वा यांनीच यासाठी खासगी विधेयक आणले. मात्र, त्‍यावेळी थातूरमातूर कारणे देऊन त्‍यांची बोळवण करण्‍यात आली, असे फर्नांडिस यांनी सांगितले.

कोकणी भाषा मंडळाला लिपी वाद मान्य नाही

सध्या जो रोमी लिपीवरून वाद उरकून काढण्याचा प्रयत्न चालू आहे, तो कोकणी भाषा मंडळाला मुळीच मान्य नसल्याचे कोकणी भाषा मंडळाच्या प्रभारी अध्यक्ष रत्नमाला दिवकर यांनी या प्रतिनिधीला सांगितले. कोकणीला साहित्य अकादमीची मान्यता मिळाली आहे. कोकणीचा आठव्या परिशिष्टात समावेश आहे. कोकणी गोव्याची अधिकृत भाषा आहे. अशावेळी लिपी वाद आमच्या पुरता संपलेला आहे. राजभाषा कायद्यात बदल आम्हाला मान्य नाही, असेही दिवकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com