Goa Casino Case Dainik Gomantak
गोवा

Goa Casino Case: प्रतिज्ञापत्र वेळेत दाखल करा, अन्यथा दंड! 'कॅसिनो' प्रकरणात गोवा खंडपीठाचा प्रतिवादींना स्पष्ट इशारा

Goa Casino Ship Case: प्रतिज्ञापत्रे वेळेत दाखल न करण्याच्या वाढत्या प्रकारांबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: प्रतिज्ञापत्रे वेळेत दाखल न करण्याच्या वाढत्या प्रकारांबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे अशा विलंबासाठी संबंधित पक्षांवर दंड आकारला जाईल, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला. ‘इनफ इज इनफ’ने कॅसिनो जहाजाविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा इशारा देण्यात आला.

सरकारने विहित मुदतीत प्रतिज्ञापत्र दाखल केले नसल्याचे याचिकादाराने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. १८ ऑगस्ट २०२६ रोजी स्पष्ट आदेश दिलेले असतानाही प्रतिज्ञापत्रे वेळेत सादर न झाल्याने प्रकरणाच्या सुनावणीला विनाकारण विलंब होत असल्याचे खंडपीठाने नमूद केले.

अशा प्रकरणांत आता कडक भूमिका घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रकरणांच्या फाईल्स सर्क्युलेट करणे आणि त्यांची बोर्डावर नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रीला मोठा खर्च करावा लागतो, असेही न्यायालयाने नमूद केले. सुनावणीदरम्यान प्रतिवादींच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात झालेली चूक मान्य केली. तसेच, गुरुवारी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची परवानगी मागितली.

आज शेवटची मुदत

प्रतिवादींना गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्रे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली. ही शेवटची सवलत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. यापुढे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास विलंब झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

अंतिम सुनावणी २९ सप्‍टेंबरला

मूलतः २९ सप्‍टेंबर रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध असलेले प्रकरण त्याच दिवशी अंतिम सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. सर्व पक्षकारांना प्रत्युत्तर असल्यास ते २८ सप्‍टेंबरपर्यंत अपलोड करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super El Nino: 450000 लोकांच्या जीवाला धोका! 'सुपर एल नीनो' ठरतोय खतरनाक, भारतसह 11 देशांमध्ये वाढला धोका; 2027 जगासाठी ठरणार विध्वंसक? VIDEO

Porvorim Traffic Congestion: पर्वरीतील 300 मीटरचा पट्टा ठरू शकतो वाहतुकीचा 'हॉटस्पॉट'; उन्नत मार्ग-अटल सेतू जोडणीसाठी नेमका काय उपाय?

IND vs WI: कॅरेबियन गोलंदाजांवर तुटून पडणार 'हिटमॅन' आणि 'किंग कोहली'! विंडीजविरुद्धच्या मालिकेत 5 महाविक्रम मोडण्यासाठी 'रो-को' सज्ज; सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड धोक्यात

संपादकीय: दिवा विझला, यात्रा निघाली!

Viral Video: बाईकवर चौघांचा जीवघेणा स्टंट! जागा कमी पडली म्हणून एकजण थेट मित्राच्या खांद्यावर बसला; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस ॲक्शन मोडमध्ये

SCROLL FOR NEXT