IPL Auction Goa: गोव्यात पुन्हा रंगणार 'आयपीएल'चा लिलाव; डिसेंबरमध्ये होणार भव्य आयोजन, 15-16 तारखेची शक्यता

IPL Auction in Goa: गोव्यात येत्या डिसेंबरमध्ये दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचा लिलाव होणार आहे.
IPL Auction in Goa
IPL Auction GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात येत्या डिसेंबरमध्ये दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचा लिलाव होणार आहे. यापूर्वी २००९ मध्ये स्पर्धेचा मिनी लिलाव उत्तर गोव्यात झाला होता.

आयपीएल चेअरमन अरुण धुमल यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्याच्या मध्यास गोव्यात आयपीएल लिलाव होईल. यापूर्वी तीन वेळा परदेशात (अनुक्रमे दुबई, जेद्दाह, अबु धाबी) लिलाव प्रक्रिया पार पडली होती.

IPL Auction in Goa
Goa BJP: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा संघटनात्मक बदल; भारती पवार प्रभारी तर अनिल अँथनी सहप्रभारी

आता देशात लिलावाचे पुनरागमन होत आहे. ‘‘आम्ही गोव्यात ठिकाण निश्चित केले आहे. १५ ते १६ डिसेंबर या संभाव्य तारखा आहेत,’’ असे धुमल यांनी सांगितले. गोवा क्रिकेट असोसिएशनमधील (जीसीए) सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, यावेळचा आयपीएल लिलाव दक्षिण गोव्यात होऊ शकतो.

‘जीसीए’चा या प्रक्रियेत थेट सहभाग नसेल. लिलाव प्रक्रिया आयपीएल समिती हाताळेल. लिलावानिमित्त सहभागी फ्रँचायजी संघाचे मालक, सहमालक, सीईओ, कर्णधार, मेंटॉर, प्रमुख खेळाडू उपस्थित राहतील.

IPL Auction in Goa
Goa Congress: 'गोवा काँग्रेस पक्ष' खरंच आधीपासून अस्तित्वात होता का? निवडणूक आयोग सोमवारी प्रतिज्ञापत्रातून उलगडणार पक्षाच्या नावाचे गूढ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com