Goa Cashew Season 2026 Dainik Gomantak
गोवा

Cashew Season: गोमंतकीयांसाठी खुशखबर! काजू हंगामाला सुरुवात, भट्ट्या लवकर पेटणार; फेणी, हुर्राक गाळप होणार सुरु

Goa Cashew Season 2026: पुढील दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात हंगामाला सुरुवात होईल. फेणी, हुर्राक काढण्यासाठी भट्ट्या पेटू लागणार आहे. थंडी काजूसाठी पोषकच आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात गेल्या पाच वर्षात काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय कमी प्रमाणात उत्पादन मिळाले परंतु यंदा हवामान पोषक असून काही प्रमाणात काजू हंगामाला सुरुवात देखील झाली आहे.

पुढील दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात हंगामाला सुरुवात होईल. फेणी, हुर्राक काढण्यासाठी भट्ट्या पेटू लागणार आहे. थंडी काजूसाठी पोषकच आहे परंतु दव पडले तर मोहर खराब होऊ शकतो, असे कृषी उपसंचालक दत्तप्रसाद देसाई यांनी सांगितले.

आंबे पीकही समाधानकार...

राज्यातील अनेक भागात आंब्याला चांगला मोहोर आलेला आहे. राज्यातील काही बाजारपेठांमध्ये हंगामातील पहिल्या मानकुराद आंबा दाखल झाला आहे. परंतु अजून काही भागात मोहोर आहे, काही ठिकाणी छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत. बाजारात मध्यम आकाराच्या कैऱ्या विक्रीसाठी देखील दाखल होत असून महिन्याभरात म्हणजेच मार्चच्या मध्याला स्थानिक आंबे बाजारात विक्रीसाठी दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तापमानातील अंतर धोक्याचे

राज्यात काजू हंगामाला आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. पीकही यंदा चांगले येण्याची शक्यता आहे परंतु सध्या कमाल आणि किमान तापमानात १० अंशाहून अधिकचा फरक मागील दोन-तीन दिवसांपासून जाणवत आहे. हा फरक येत्या आठवडाभर असाच राहिला तर त्याचा काही प्रमाणात परिणाम उत्पादनावर होऊ शकतो

मागील काही दिवसांपासून नवे काजू पीक येऊ लागले आहे. परंतु अजून हवा तसे उत्पादन आलेले नाही. भाटी सुरू करावी इतके बोंडू देखील उपलब्ध नाहीत. परंतु पुढील दोन आठवड्यात फेणी, हुर्राक भट्ट्या आणि उत्पादन मिळायला सुरू होईल.

- सुनील हरवळकर, युवा शेतकरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT