Goa cashew heritage | goa feni history | cashew cultivation in goa Dainik Gomanatak
गोवा

निरा, हुर्राक, फेणी! 16 व्या शतकात, पोर्तुगीज काळात गोव्यात रोवलेल्या काजूच्या पहिल्या रोपाची झाडावेगळी अद्वितीय रूपे

Goa Cashew Heritage: काजूचे झाड, फुटबॉल खेळ आणि कार्निव्हल यांचे मूळ ब्राझीलमध्ये असले तरी या तिन्हीनी गोव्यात आपले घट्ट मूळ धरले आहे. गोव्यातील कार्निव्हल नुकताच आटोपला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

काजूचे झाड, फुटबॉल खेळ आणि कार्निव्हल यांचे मूळ ब्राझीलमध्ये असले तरी या तिन्हीनी गोव्यात आपले घट्ट मूळ धरले आहे. गोव्यातील कार्निव्हल नुकताच आटोपला आहे आणि काजूचा मोसम ऐन भरात आला आहे. वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने काजू हे फळ नसले तरी त्याचा फळाचा रस गोमंतकीयांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.‌

निरा, हुर्राक, फेणी अशा चढत्या श्रेणीत त्या रसाची अहम रुपे साक्षात अवतरताना या मोसमात अनुभवायला मिळतात. अलीकडच्या काळात (२००९ साली) जागतिक मानांकनाला पात्र झालेली गोव्याची फेणी ही सोळाव्या शतकातील पोर्तुगीज काळात गोव्यात रोवलेल्या काजूच्या पहिल्या रोपाचे झाडावेगळे अद्वितीय रूप आहे असे म्हणायला हरकत नाही.

रशियाला पोहोचलात तर तिथले व्होडका हे पेय वारसा पेय म्हणून आपल्याला सामोरे येईल. जर्मनीला गेलात तर आपल्याला बियर सर्व्ह केली जाईल, जपानमध्ये साकेचा ग्लास  उंचावून आपले स्वागत केले जाईल तर गोव्यात अर्थातच फेणी ते स्थान घेईल.‌ मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे काजूचे उत्पादन कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम फेणीच्या डिस्टिलेशनवर होताना दिसतो आहे.

फेणीला मिळालेल्या ग्लॅमरमुळे ''काजू फेस्ट'' सारखे उत्सव आता गोव्यात सुरू झाले आहे. अर्थात काजू हा जो आपला वारसा आहे जो शेतकऱ्यांनी जिवंत ठेवला आहे आणि उत्सव हे केवळ त्याचे एक बाह्य मोजमाप आहे. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रजातीच्या काजू कलमांनी गोव्यातील काजूच्या उत्पादनाला आकार दिला आहे हे आपल्याला ठाऊक असले पाहिजे.

उदाहरणार्थ, 1970च्या सुमारास आनंद फळारी यांनी नानोडा येथील डोंगरावर वेंगुर्ला मालिकेतील काजू कलमांची प्रथम लागवड केली. या मालिकेतील रोपांवरील काजू उत्पादन जानेवारीच्या अखेरीस सुरू होऊ शकते. जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात हुर्राक पीत असाल तर ते लवकर पिकणाऱ्या या जातीमुळे (वेंगुर्ला- ४) आहे. सुमारे ४५० वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी गोव्याला काजूची ओळख करून दिली.

सुरुवातीला वनीकरण आणि माती संवर्धन हाच काजूच्या झाडे लागवड करण्यामागंचा त्यांचा हेतू होता. पुढील १०० वर्षे काजूला कोणतेही आर्थिक मूल्य नव्हते मात्र त्यानंतर काजूची व्यावसायिक क्षमता स्पष्ट झाली आणि त्याचे महत्त्व हळूहळू वाढले. गोव्यातील काजू प्रक्रिया तंत्रज्ञानाचा इतिहास अशाप्रकारे ३५० वर्षांचा आहे. आज गोव्यात काजू उत्पादनासाठी सुमारे ५५००० हेक्टर जमीन वापरली जाते ज्यातून दरवर्षी अंदाजे २८००० काजू उत्पादन मिळते. काजू हे केवळ व्यावसायिक उत्पादन नाही तर तो गोव्याच्या वारसाचा एक भाग देखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT