Cashew Plantation Fire: धावे येथे काजू बागायत जळून खाक, अडीचशे झाडे जळाल्‍याचा अंदाज; दीड लाखांची हानी

Valpoi Fire: सत्तरीतील नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे गावातील संदेश भास्कर गाडगीळ यांच्या काजू बागायतीला आग लागून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले.
Cashew Plantation Fire
Cashew Plantation FireDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरीतील नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे गावातील संदेश भास्कर गाडगीळ यांच्या काजू बागायतीला आग लागून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले.

गुरुवारी दुपारी एकच्‍या सुमारास ही घटना घडली असावी, कारण सकाळच्या सत्रात बागायतीत कामगार होते. या दुर्घटनेत जवळपास अडीचशे काजूची झाडे जळाल्‍याचे मालक संदेश गाडगीळ यांनी सांगितले.

Cashew Plantation Fire
Goa Agriculture: दुर्गंधीयुक्त मळीमुळे मिरची शेती धोक्यात, खालवडे-काणकोण येथे ओहोळाच्या पाण्यासह शेतजमीनही प्रदूषित

आग मुद्दाम लावली?

ही आग कोणीतरी मुद्दाम लावल्याचा संशय मालक संदेश गाडगीळ यांनी व्‍यक्त केला. कारण या क्षेत्रात वीजवाहिनी नाही. तसेच आग अचानक लागण्‍याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, असे ते म्‍हणाले.

Cashew Plantation Fire
Goa Tourist Assault: आगोंद किनाऱ्यावर दिवसाढवळ्या राडा! परदेशी महिला पर्यटकाला किरकोळ वादातून बेदम मारहाण; 22 वर्षीय रोहनला बेड्या

वरगाव-तामसुले येथेही काजू बागायत खाक

माशेल भागातील तामसुले-वरगाव डोंगरमाथ्यावरील काजू बागायतीला गुरुवारी अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाला डोंगरमाथ्यावर वाहन नेणे कठीण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com