Cashew Fest Panjim Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew Fest: फक्त काजू नाही, मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पणजीत रंगणार तीन दिवसीय 'काजू महोत्सव'

Goa Cashew Festival 2025: यंदा देखील तीन दिवसांसाठी राज्यात काजू फेस्टिवलचं आयोजन केलं जाईल अशी माहिती वन विकास महामंडळाचा अध्यक्षा आमदार डॉ. देविया राणे यांनी दिली

Akshata Chhatre

Cashew Farming Goa: गोव्यातील सर्वात महत्वाचं पीक म्हणजे काजू. साधारण एप्रिल महिन्यापासून सुरु होणार काजूचा हंगाम जून महिन्यापर्यंत चालतो आणि याच काळात गोव्यात काजू फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील तीन दिवसांसाठी राज्यात काजू फेस्टिवलचं आयोजन केलं जाईल अशी माहिती वन विकास महामंडळाचा अध्यक्षा आमदार डॉ. देविया राणे यांनी दिली आहे.

गोव्यात काजू फेस्टिवलचं यंदाचं हे तिसरं वर्ष असणार आहे. यंदाच्या वर्षी होणाऱ्या काजू फेस्टिवलबद्दल माहिती देताना डॉ. देविया राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. वन विकास महामंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचे पणजीत उद्घाटन होईल. २५, २६ आणि २७ एप्रिल असे तीन दिवसांसाठी करण्यात आलेय आणि संध्याकाळी ४:३० वाजल्यानंतर हा कार्यक्रम सुरु होईल.

या कार्यक्रमात ५० पेक्षाही अधिक विक्रेते त्यांची दुकानं मांडणार आहेत शिवाय मनोरंजनासाठी काही खेळ आणि आकर्षक बक्षिसं देखील दिली जाणार आहेत. यंदाच्या वर्षी या काजू महोत्सवाला एक्सप्लोर, एम्पावर आणि एन्रिच अशी टॅगलाईन देण्यात आलीये.

याबद्दल बोलताना डॉ. देविया राणे म्हणाल्या की काजूच्या पिकाबद्दल अधिक माहिती मिळावी असा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. काजूच्या फळाचा वापर नेमका कसा आणि किती ठिकाणी केला जातो हे या कार्यक्रमाच्या वेळी दाखवलं जाईल.

शिवाय काजूमुळे स्थानिक शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याची माहिती देखील दिली जाणार आहे. गोव्यातील काजू हा सध्या जगभरात ओळखला जातोय मात्र यातही काही परराज्यांची भेसळ झालेली पाहायला मिळते, असं होऊ नये आणि गोव्यातील काजू सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT