Calangute Police Crackdown Dainik Gomantak
गोवा

Goa Tourists Safety: किनाऱ्यावर महिलांचे गुपचूप फोटो काढणाऱ्यांची आता खैर नाही, गोवा पोलीस ॲक्शन मोडमध्ये; 'फोटोबाज' पर्यटकांविरुद्ध कारवाईचा बडगा

Calangute Police Crackdown: कळंगुट पोलिसांनी अशा विकृत प्रवृत्तीच्या पर्यटकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Manish Jadhav

कळंगुट: गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांसाठी कळंगुट पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला असून, महिलांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध आता कठोर पावले उचलली जात आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या काही देशी पर्यटकांकडून महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो काढण्याचे किंवा व्हिडिओ बनवण्याचे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर कळंगुट पोलिसांनी अशा विकृत प्रवृत्तीच्या पर्यटकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. जर एखादी व्यक्ती कोणत्याही महिलेच्या संमतीशिवाय तिचे गुपचूप व्हिडिओ बनवताना किंवा फोटो काढताना आढळली, तर तिच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल केले जातील.

दोन-तीन दिवसांपूर्वी गोव्यातील (Goa) समुद्रकिनाऱ्यांवरील काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा महिलांना माहिती नसताना त्यांचे आक्षेपार्ह अँगलने व्हिडिओ बनवले जातात आणि ते इंटरनेटवर अपलोड केले जातात. या प्रकारामुळे गोव्याच्या पर्यटनावरही वाईट परिणाम होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या तक्रारींची दखल घेत पोलीस आता साध्या वेशातही किनाऱ्यावर गस्त घालत असून संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे.

कळंगुट पोलिसांनी स्पष्ट केले की, समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा आणि आनंद घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा किंवा कोणाचीही मानहानी करण्याचा अधिकार कोणालाही नाही. विशेषतः महिलांना त्रास देणाऱ्या किंवा त्यांची छुप्या पद्धतीने फोटो काढणाऱ्या पर्यटकांना आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. पोलिसांनी पर्यटकांना आवाहन केले की, त्यांनी नियमांचे पालन करावे आणि जबाबदार पर्यटक म्हणून वागावे.

या मोहिमेमुळे किनाऱ्यावर येणाऱ्या महिला (Women) पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे. तसेच, अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाकडून या कारवाईवर लक्ष ठेवले जात असून, पकडल्या गेलेल्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यटकांनी लक्षात ठेवावे की, तुमचा एक 'क्लिक' तुम्हाला महागात पडू शकतो आणि तुम्हाला पोलीस कोठडीत नेऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT