Goa Crime News | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: पर्यटकांची अरेरावी! अंगावर कार चढवत पोलीस हवालदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय

Ganeshprasad Gogate

Calangute Crime सध्या गोव्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असून यात स्थानिकांसह पर्यटनासाठी येणाऱ्या परप्रांतियांचाही हात असल्याचे दिसून आले आहे. अशीच एक घटना रविवारी कळंगुट येथे घडलीय.

कळंगुटमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारचा थरार पाहायला मिळाला. बंगळूर आणि कारवार येथून पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या दोघांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस हवालदाराच्या अंगावर कार चढ़वल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

उपलब्ध झालेल्या माहिती नुसार पोलीस हवालदार विद्यानंद आमोणकर ड्युटीवर असताना त्यांना फेअरफिल्ड, मॅरियट हॉटेल नजीक लाल रंगाची टाटा टियागो कार (KA 04 BN 8391) उभी असल्याचे आढळून आली. यावेळी त्यांना या गाडीतील पर्यटक अनैतिक काम करत असल्याचा संशय आला.

त्यानुसार आमोणकर यांनी कारजवळ जाऊन गाडीतील दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आपल्याला पकडले आहे हे लक्षात येताच ड्रायव्हर शेजारच्या व्यक्तीने दरवाजा उघडून गाडीच्या मागच्या बाजूने पळ काढला.

आमोणकर यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग करून पकडले. हे पाहून गाडीच्या ड्रायव्हरने आपली कार बेदरकारपणे रिव्हर्स घेऊन आमोणकर यांच्या अंगावर चढवत त्यांना काही अंतरावर फरफटत नेले.

मात्र गस्तीवर असलेल्या अमीर गरड व विजय नाईक या दोघा पोलिसांनी दोन्ही पर्यटकांना ताब्यात घेतले. या घटनेत आमोणकर हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी संशयित आरोपी वसंत मडिवाल (कारवार) सुंदीपकुमार एम.(रा. बंगळूर) या दोघांना पोलिसांनी अटक केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drugs In Goa: कैद्यांना जर ड्रग्स मिळत असतील, तर बिट्स पिलानी ‘किस झाड की पत्ती’! गोव्याच्या मानगुटीवर बसलेले भूत

आत्महत्या की हत्या? 24 तास बेपत्ता, झुआरी पुलाजवळ आढळलेला मृतदेह, असोल्डातील व्यक्तीच्या मृत्यूने वाढले गूढ

Valpoi: वाळपईत 4 वर्षांत दगावली 154 गुरे! वाढती प्लास्टिक समस्या चिंताजनक; 12 महिन्यांची वासरेही बाधीत

'कुंपणंच खातंय शेत', केस मिटवण्यासाठी पोलिसाने घेतली लाच; वाळपईत हेड कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई

Rajmata Jijabai Karandak: गोव्याने गुजरातला हरवले! करिष्माचा मौल्यवान गोल; मुख्य फेरीतील जागा पक्की

SCROLL FOR NEXT