Davorlim Murder Case: सादिक बेल्लारी खूनप्रकरणी मोठी अपडेट; सातवा संशयित मुज्जू याला अटक

कुडतरी पोलिसांनी राय सोनारवाडा येथून काल रात्री उशिरा अटक केली.
Davorlim Murder Case
Davorlim Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Davorlim Murder Case:  रुमडामळ हाऊसिंग बोर्डमधील सादिक बेल्लारी याच्या खूनप्रकरणी सातवा संशयित मुज्जू ऊर्फ मुझफ्फर हकीम याला मायणा कुडतरी पोलिसांनी राय सोनारवाडा येथून काल रात्री उशिरा अटक केली.

रुमडामळ हाऊसिंग बोर्ड येथील सादिक बेल्लारी याच्या खूनप्रकरणी कर्नाटक येथे पळून गेलेल्या संशयित कादर खान खानजादे, तौसिक कदेमणी व राहिल पानवाला यांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर हत्येचा कट रचणार्‍या संशयित राहिल पानवाले, त्याचा भाऊ जावेद पानवाले व कबीर खानजादे याना मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केली.

सादिक याचा खून पूर्ववैमनस्यातून खुनासाठी कट रचण्यात आल्याचे तपासात पुढे आले होते. मुजाहिद खान याच्या 2020 मधील खुनाचा बदला घेण्यासाठीच हा प्रकार झाला.

मायना कुडतरी पोलिसांच्या चौकशीवेळी खुनाचे कटकारस्थान राहिल पानवाला व इतर संशयितांनी रचल्याचे व मुजाहिद खान याच्या खुनाच्या बदल्यासाठी सादिक, राहिल यांच्या गॅंगने कट रचून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले.

मायना कुडतरी पोलिसांकडून शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणातील आणखी एका संशयिताला अटक केली. मुझफ्फर ऊर्फ मुज्जू हा संशयित मूळ सवनूर कर्नाटक येथील असून सध्या चंद्रावाडा फातोर्डा येथे राहत होता.

गेले काही दिवस पोलिसांकडून मुज्जू याचा तपास केला जात होता. मात्र, पोलिसांपासून तो लपून राहत होता. शनिवारी रात्री राय सोनारवाडा येथून संशयित मुज्जू याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

Davorlim Murder Case
Goa Accident: शिवोलीत पर्यटकांच्या कारवर कोसळले आंब्याचे झाड, दिल्लीला परतत असताना घडली दुर्घटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com