Garbage Treatment Dainik Gomantak
गोवा

Cacora Garbage Treatment Plant: 100 टन प्रक्रियेची क्षमता असूनही कचरा नेला जातोय साळगावला, दिवसाला केवळ 15 टन कचऱ्यावर प्रक्रिया

गोमन्तक डिजिटल टीम

Cacora Garbage Treatment Plant काकोडा येथे गेले ९ महिने अधिकृत उद्‍घाटनाविना सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता १०० टनांची असतानाही दिवसाला केवळ १५ टनच कचऱ्यावर तेथे प्रक्रिया होत आहे.

गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या एका समितीने त्या प्रकल्पाची पाहणी केली, तेव्हा ही धक्कादायक बाब उघड झाली. विशेष म्हणजे मडगावहून १८ कि.मी.वर हा प्रकल्प असताना या प्रकल्पात सोनसडो मडगाव येथील कचरा नेण्याऐवजी तो ४० कि.मी.वरील साळगाव येथे नेला जात आहे.

या प्रकल्पाचे काम ९ महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आणि त्याचा वापरही सुरू झाला आहे. गेल्या महिन्यापर्यंत हा प्रकल्प चालवणाऱ्या मे. वसुधा वेस्ट ट्रिटमेंट या कंपनीसोबत महामंडळाने करार केला नव्हता. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला कोणतीही रक्कम अदा करण्याचे बंधन महामंडळावर नव्हते.

आपण असे किती दिवस काम करत राहणार अशी कंपनीकडून विचारणा झाल्याने अखेर गेल्या महिन्यात अधिकृतपणे हा प्रकल्प चालवण्याविषयी महामंडळाने कंपनीशी करार केला. त्यामुळे आता त्या कंपनीला महिन्याला ६० लाख रुपये मिळणार आहेत.

प्रत्यक्षात ती कंपनी ९ लाख रुपयांचेच काम करणार आहे. या प्रकल्पाची क्षमता १०० टनांची असली, तरी १२५ टन कचरा आला तरी त्यांना साठ लाख रुपयांव्यतिरिक्त अधिक रक्कम मागता येणार नाही अशी करारात तरतूद आहे.

मात्र सरकार त्यांना दररोज १५ टनांपेक्षा अधिक कचराच पुरवू शकत नाही ही वस्तुस्थिती समितीच्या नजरेस आली आहे.

कंपनीला मिळणार ६० लाख रुपये

कचरा प्रक्रियेसाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ मे. वसुधा वेस्ट ट्रीटमेंट कंपनीला वर्षाला ७ कोटी २० लाख रुपये देणार.

प्रती टन कचऱ्यासाठी कंपनी दोन हजार रुपये आकारेल असे गृहीत धरून महिन्याचे साठ लाख रुपये देणे ठरवण्यात आले आहे. गेल्या महिन्यात करार झाल्याने या महिन्यात कंपनीला ६० लाख रुपये मिळणार.

जूनमध्ये २० हजार ८७४ किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती

प्रकल्पातून मे महिन्यात ३८ हजार ७६२ घनमीटर, तर जूनमध्ये ४१ हजार ३०७ घनमीटर वायूची निर्मिती करण्यात आली आहे. मे मध्ये २१ हजार ८०२ किलोवॅट, तर जूनमध्ये २० हजार ८७४ किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती झाली आहे.

मे मध्ये ३८ हजार ७६२, तर जूनमध्ये ४१ हजार ३०७ टन कंपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्पात आलेल्या कचऱ्यात मे मध्ये १५.४३ टक्के, तर जूनमध्ये १५.३७ टक्के पूनर्प्रक्रिया करण्याजोगेसाहित्य होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT