Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गोवा मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्‍यता, दिल्लीत पार पडली बैठक; CM सावंतांना वगळता सर्व मंत्र्यांचे घेणार राजीनामे

Goa Cabinet Reshuffle: गोवा राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यासाठी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची सूचना भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली जाणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोवा राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यासाठी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची सूचना भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केली जाणार आहे. गोव्यातील राजकीय घडामोडींबाबत नवी दिल्लीत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली.

या चर्चेवेळी मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय चर्चेला आला. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यापुरता विषय मर्यादित न ठेवता २०२७ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ फेरबदल करावा असे ठरविण्यात आले आहे. हा संदेश मुख्‍यमंत्र्यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी देण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री अलीकडे काही आमदारांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यांना उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्या-त्या आमदारांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी ‘तुमच्‍या भावना समजल्या असून, त्याची पूर्ती लवकरच होईल’ असे सूचक उद्‍गार काढले होते. मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल हवा असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र फेरबदलाच्या विषयास पक्षश्रेष्ठींची परवानगी मिळाली नव्हती.

मुख्यमंत्र्यांना कायम ठेवून बदल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपल्या पातळीवर राजकीय अहवाल दिल्लीत सादर केला आहे. त्याचाही विचार मंत्रिमंडळ फेरबदलावेळी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपदी डॉ. प्रमोद सावंत यांना कायम ठेवून मंत्रिमंडळ फेरबदल करण्यात येणार आहे. हे काम सोपे व्हावे यासाठी एका मंत्र्याचाच नव्हे तर ११ मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील आणि कामगिरीच्या आधारे नंतर त्यांपैकी काहींचा मंत्रिमंडळात फेरप्रवेश केला जाईल, असे समजते.

दामूंनी तयार केले मंत्र्यांचे प्रगतिपुस्‍तक

भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांची वर्णी लागल्‍यानंतर त्यांनी आमदार, मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक करण्याच्या कामास गती दिली. मासिक व द्वैमासिक अहवालाच्या पद्धतीनुसार त्‍यांनी पक्षश्रेष्‍ठींना माहिती देणे सुरू केले. त्यावरून पक्षश्रेष्ठींनी गोव्याच्या राजकारणाबाबत आपले आकलन तयार केले आहे. त्यांचेही मत आता मंत्रिमंडळ फेरबदल हवा असे झाले आहे. त्यानंतर या हालचालींना गती आली आहे. मंत्रिमंडळाची फेररचना हा विषय प्राधान्यक्रमाने हाताळला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT