Goa Cabinet Decisions  Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet: म्हापसा अर्बनमध्ये अडकलेले लोकांचे पैसे परत मिळण्यासाठी गोवा सरकराचा मोठा निर्णय, 25 कोटींना खरेदी करणार नंदादीप इमारत

CM Dr. Pramod Sawant: गोवा सरकार म्हापसा अर्बन बँकेची नंददीप इमारत २५ कोटी रुपये देऊन ताब्यात घेणार आहे

Akshata Chhatre

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा मंत्रिमंडळाने राज्याची सांस्कृतिक ओळख, कृषी क्षेत्र आणि नागरी सुविधा मजबूत करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. गुरुवारी (दि. ६ मार्च) रोजी पर्वरीतील मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देताना राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा अर्बन बँकेची नंददीप इमारत ताब्यात घेण्याबरोबरच आध्यात्मिक महोत्सवांना मोठी मदत करणाऱ्या आणि पशुवैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदीची माहिती दिली.

म्हापसा अर्बनची इमारत सरकारच्या ताब्यात

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा सरकार म्हापसा अर्बन बँकेची नंददीप इमारत २५ कोटी रुपये देऊन ताब्यात घेणार आहे. गोव्यातील जनतेचे अडकलेले पैसे त्यांना परत मिळावे म्हणून सरकारने ही इमारत ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि यानंतर सरकारकडून नवीन इमारत बांधली जाईल, केवळ जनतेच्या हितासाठी सरकारने कोटेशननुसार २५ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री म्हणालेत.

सरकारकडून अध्यात्मिक पर्यटनाला चालना

आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संस्कृतीचे जतन करत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी, कला आणि संस्कृती विभागाकडून तपोभूमीला १.५ कोटी रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीये.

हे अनुदान आध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यास मदत करेल, ज्यामुळे गोव्याची समृद्ध धार्मिक परंपरा जपली जाईल. तसेच प्रदर्शनच्या खर्चासाठी ५ कोटी रुपयांच्या एक्स-फॅक्टो मंत्रिमंडळाकडून मंजूर झाला आहे.

२४ पशुवैद्यकीय सहाय्यकांची भरती

कृषी क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन, सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्थेकडून पशुखाद्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश गोव्यातील पशुधनासाठी आवश्यक खाद्याचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करत स्थानिक शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे. याव्यतिरिक्त, पशु आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी सरकारकडून २४ पशुवैद्यकीय सहाय्यकांची भरती केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT