Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'म्हादई'प्रश्नी गोव्याच्या शिष्टमंडळाला अमित शाह यांनी दिले 'हे' आश्वासन...

कर्नाटकला दिलेली मंजुरी रद्द करण्यासह म्हादई पाणी प्राधिकरणाची स्थापना करण्याची निवेदनाद्वारे मागणी

Akshay Nirmale

Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्नी राज्यात उसळलेला जनक्षोभ आणि आक्रमक झालेले विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पर्यावरणवादी कार्यकर्ते या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिष्टमंडळासह बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. म्हादईविषयी गोव्याची बाजू शिष्टमंडळाने सविस्तरपणे अमित शाह यांच्यासमोर मांडली. दरम्यान, आपण या प्रश्नात लक्ष घालू, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले आहे.

कळसा आणि भांडुरा या म्हादईच्या उपनद्यांचे पाणी वळविण्यासाठी केंद्रीय जलआयोगाने कर्नाटकाच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) दिलेली मंजुरी रद्द करावी, तसेच म्हादई पाणी प्राधिकरण स्थापन करावे अशा मागण्यांचे निवेदन यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शाह यांना देण्यात आले.

शिष्‍टमंडळात मुख्यमंत्री सावंत यांच्यासह केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, वनमंत्री विश्वजीत राणे आणि ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांचा सहभाग आहे.

म्हादईच्या उपनद्यांचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकाला जलआयोगाने दिलेल्या डीपीआर मंजुरीनंतर संबंधित प्रकल्पासाठी राष्ट्रीयस्तरावरची निविदा काढली आहे. दरम्यान, सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत ‘चलो साखळी’ची हाक दिली असून 16 जानेवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गावी हे आंदोलन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT