Goa Cabinet Decisions  Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Cabinet Decisions: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले

Akshata Chhatre

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा मंत्रिमंडळाने बुधवार(दि.१०) अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये दिवाडी येथील सप्तकोटेश्वर मंदिराच्या जागेवर कोटी तीर्थ कॉरिडॉर विकसित करण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या धार्मिक स्थळाचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय मंत्रिमंडळाने अनेक विषयांना मंजुरी दिली आहे.

लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग क्षेत्राला प्रोत्साहन

मंत्रिमंडळाने गोवा राज्य लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंग प्रोत्साहन योजना २०२५ (Goa State Logistic & Warehousing Incentive Scheme 2025) मंजूर केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग क्षेत्राला भांडवली अनुदान (capital subsidy) आणि कर्ज व्याज अनुदानाच्या (loan interest subsidy) स्वरूपात प्रोत्साहन दिले जाईल.

पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि खाण कचरा व्यवस्थापन

राज्यातील गोवा कॉलेज ऑफ व्हेटर्नरी ॲन्ड ॲनिमल सायन्सेससाठी (Goa College of Veterinary and Animal Sciences) अधिष्ठाता (Dean) नियुक्त करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याव्यतिरिक्त, गोव्यातील लोह खनिज पुनर्प्राप्ती आणि खाण कचरा स्थिरीकरणासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून द एनर्जी ॲन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (TERI) या संस्थेची नियुक्ती करण्यासही मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे.

इंडियन रेसिंग फेस्टिव्हलसाठी मुरगाव स्ट्रीट सर्किट

मंत्रिमंडळाने २०२५ च्या इंडियन रेसिंग फेस्टिव्हलच्या चौथ्या फेरीसाठी मुरगाव स्ट्रीट सर्किटला (Mormugao Street Circuit) ठिकाण म्हणून मान्यता दिली आणि यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा कार्यक्रम मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करेल, अशी आशा व्यक्त केली.

विधानसभा अध्यक्षांच्या उमेदवारीसाठी 'मुहूर्त'

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या उमेदवारीबाबत मोठे विधान केले. अध्यक्षांची नियुक्ती कधी होणार, या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी २३ सप्टेंबरचा 'मुहूर्त' असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT