मडगाव : मला पुण्याला जायचे आहे पण माझ्याकडे कोविड निगेटिव्ह दाखला नाही, काय करावे, असे विचारल्यावर बस कंपन्यांकडून तुम्ही अतिरिक्त सहाशे रुपये भरा आणि दाखला मिळवा, असे खुशालपणे सांगितले जाते. डेल्टा प्लसचे (Delta Plus) सावट असताना, कर्फ्यू (Goa Curfew) असतानाही बसकंपन्यांचा हा फंडा धक्कादायक आहे. राय येथील फ्रेडी डिकॉस्ता यांनी आपल्याला आलेला अनुभव ''गोमन्तक''शी शेअर केला.
डिकॉस्ता हे मुंबईला जाणार होते, त्यांनी एका बस कंपनीकडे संपर्क साधला असता तिकिटाच्या दरापेक्षा 600 रुपये अधिक भरल्यास तुमच्या कोविड प्रमाणपत्राचीही आम्ही सोय करू शकू असे त्यांना सांगण्यात आले. डिकॉस्ता 19 जून रोजी मडगाव बसमध्ये चढले, त्यांनी बसवाहकाला आपली कोविड चाचणी केव्हा होईल, असे विचारले असता पणजीत तुम्हाला तुमचा दाखला मिळणार, उत्तर मिळाले. या प्रकारानंतर डिकॉस्ता यांना पणजीत पोहोचल्यावर चाचणी केली जाणार, असे वाटले. मात्र कोणतीही चाचणी न करता त्यांच्या हातात निगेटिव्ह दाखला देण्यात आला. हा सारा प्रकार पाहून ते गडबडले. असेही दाखले मिळतात, याच्या विचारातच ते काही वेळ होते.
सीमेवर अजब कारभार
सीमेवर पोलिस बसमध्ये चढतात, पण ते एकाही प्रवाशाचा दाखला तपासून पाहत नाहीत. बस न तपासता तशीच सोडून दिली. जणू काही बसकंपन्यांसोबत त्यांचे साटेलोटे असावे. डिकॉस्ता म्हणाले, गोव्यातून मुंबईला जाण्यासाठी जे प्रकार घडतात तेच प्रकार मुंबईतून गोव्यात येत असताना घडत असावेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.