PM Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi: मोदींचा गोवा दौरा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन; सरकारच्या भूमिकेवर विरोधकांची शेलकी टीका

PM Narendra Modi: अधिवेशनाच्या कालावधीतच पंतप्रधान मोदी गोवा दौऱ्यावर येत असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.

Ganeshprasad Gogate

PM Narendra Modi: बेतुल येथे एनर्जी वीकचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी 6 फेब्रुवारी रोजी गोव्यात येणार असून त्यानंतर त्यांची मडगाव येथे जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या या गोवा भेटीवर आता विरोधी पक्ष नेत्यांनी टीका केली आहे.

घाबरलेले भाजप सरकार 6 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधानांच्या गोवा भेटीचे कारण देत गोवा विधानसभा अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करुन विरोधकांच्या सरळ प्रश्नांना सामोरे जाण्यापासून पळवाट काढणार नाही अशी आशा बाळगतो अशी शेलकी टिका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

6 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी गोवा दौऱ्यावर येत असून या दौऱ्याबाबत आढावा घेण्यासाठी भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर ही माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलीय. त्यावरूनच विरोधकांनी सरकारवर टोलेबाजो केलीय.

गोव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. या दरम्यान विरोध सत्ताधाऱ्यांना बेरोजगारी, स्मार्ट सिटी, पाणी प्रश्न यांसारख्या मुद्द्यावरून घेरण्याचा तयारीत आहे.

या अधिवेशनाच्या कालावधीतच पंतप्रधान मोदी गोवा दौऱ्यावर येत असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे मोदींची मडगाव येथे सभा असून २०२४ च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलणार याकडे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचेही लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT