Karnataka Tourist Death Case: एमबीएची पदवी... अन् मोहजालाचा खेळ! मृत संदीपची 'चेन' अक्षताच्या गळ्यात; तपासात धक्कादायक माहिती समोर

Karnataka Tourist Death Case Update: कॅसिनोमध्ये येणाऱ्या श्रीमंत ग्राहकांना सौंदर्याच्या आणि बोलण्याच्या मोहजालात अडकवून त्यांची लूट करणारी अक्षता एम. के. उर्फ रूपाश्री (३५) ही उच्चशिक्षित (एमबीए) असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.
Karnataka Tourist Death Case
Karnataka Tourist Death CaseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कॅसिनोमध्ये येणाऱ्या श्रीमंत ग्राहकांना सौंदर्याच्या आणि बोलण्याच्या मोहजालात अडकवून त्यांची लूट करणारी अक्षता एम. के. उर्फ रूपाश्री (३५) ही उच्चशिक्षित (एमबीए) असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. तिने यापूर्वीही अनेक श्रीमंतांना अशाच पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय आहे. उडुपी येथील व्यावसायिक संदीप सलायम (४२) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी म्हापसा न्यायालयाने शनिवारी तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, संदीप यांच्या मृत्यूनंतर फरार झालेली अक्षता त्यांचीच महागडी सोन्याची साखळी गळ्यात घालून बंगळुरूमध्ये बिनधास्त फिरत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले, तेव्हाही ही साखळी तिच्या गळ्यातच होती. त्यामुळे तपासातील एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला. अक्षता ही मूळची चिक्कमंगळुरू येथील असून ती सध्या बंगळुरूमध्ये राहत होती.

Karnataka Tourist Death Case
Goa crime: 'लडकी चाहिए क्या?’... पुढे सुरू होतो लुटीचा खेळ

एमबीए पदवीधर असलेली ती विवाहित असून तिचा पती शेती करतो. त्यांना दोन मुले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कळंगुट पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

कन्नड भाषेतून ओळख... सोन्याच्या दागिन्यांवर नजर

अक्षताला केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषा अवगत आहेत. पणजीतील एका कॅसिनोमध्ये संदीप सलायम आपल्या मित्रांसोबत कन्नडमध्ये संवाद साधत असताना तिची त्यांच्यावर नजर गेली. संदीप यांच्या गळ्यातील जाड सोनसाखळी आणि हातातील सोन्याची कडी पाहून तिने त्यांनाच लक्ष्य केले.

स्वतःहून कन्नडमध्ये संवाद सुरू करत तिने अल्पावधीतच त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना एका रिसॉर्टवर नेले. विशेष म्हणजे, संदीप यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनीही तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ संदीप यांनाच आपल्या मोहजालात अडकविले.

पूर्वीही अनेकांना केले होते लक्ष्य

पोलिस तपासात अक्षताने यापूर्वीही अनेकांना अशाच प्रकारे लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बदनामीच्या भीतीने अनेकांनी तक्रार करण्याचे टाळले. काही प्रकरणांत गुन्हे नोंद झाले असले, तरी तपासाला अपेक्षित गती मिळाली नाही. त्यामुळे तिचे धाडस वाढत गेले आणि अखेर या प्रकरणाचा शेवट एका संशयास्पद मृत्यूत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Karnataka Tourist Death Case
Goa Agriculture: पावसाच्या सरींनी फुलली शेतकऱ्यांची आशा; डिचोलीत शेतीकामे सुरू, कृषी खातंही सज्ज

गोळ्यांचा अतिडोस ठरला जीवघेणा?

रिसॉर्टवर गेल्यानंतर अक्षताने संदीप यांना मद्यपान करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर संधी साधून त्यांच्या पेयामध्ये गुंगीच्या गोळ्या मिसळल्याचा पोलिसांचा संशय आहे. गोळ्यांचा डोस अधिक झाल्याने संदीप बेशुद्ध पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीत, या गोळ्यांमुळे मृत्यू होईल, याची कल्पना नसल्याचा दावा अक्षताने केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com