

मडगाव: आयआयटी, एनआयटीसारख्या केंद्रीय शैक्षणिक संस्थांमधून गोमंतकीयांना अपेक्षित लाभ होत नसताना अशा संस्थांसाठी गोव्याने मोठ्या प्रमाणावर जमीन का द्यावी? असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. आयआयटीबाबत इतकीच आस्था असेल तर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्वतःच्या मालकीची जमीन द्यावी, असा टोला त्यांनी लगावला.
फर्मागुढी येथे आयआयटीला स्थानिकांनी केलेल्या विरोधाला सुदिन ढवळीकर यांनी ‘दुर्दैवी’ म्हटल्याबाबत प्रतिक्रिया देताना सरदेसाई म्हणाले, देवस्थानाची जमीन अशा प्रकल्पांसाठी वापरणे म्हणजे देवाचा शाप ओढवून घेण्यासारखे आहे. फोंड्यात ढवळीकर यांच्या मालकीच्या जमिनींपैकी एखादी जमीन त्यांनी आयआयटीसाठी द्यावी.
कुंकळ्ळीतील एनआयटीमध्ये गोमंतकीयांना किती रोजगार मिळाला, याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. केंद्रीय संस्थांमुळे स्थानिकांना रोजगार किंवा अन्य ठोस लाभ मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला.
बिट्स पिलानी केंद्र आणि गोव्यात येणाऱ्या खासगी विद्यापीठांवरही टीका करत, अशा प्रकल्पांच्या माध्यमातून गोव्याच्या जमिनी हडप केल्या जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.