

मडगाव: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नागोवा आणि वेर्णा औद्योगिक वसाहत परिसरात धडक तपासणी मोहीम राबवत १२ हॉटेल्स, किरकोळ विक्रेते आणि फेरीवाल्यांची पडताळणी केली. शिवाय फातोर्डा येथील विनापरवाना सुरू असलेल्या पॉर्क प्रक्रिया युनिटवरही कारवाई करून नोटीस बजावली.
एफडीएच्या नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई आणि अन्नसुरक्षा अधिकारी अमरदीप गावडे-प्रियोळकर यांनी ही मोहीम राबवली.
तपासणीदरम्यान दोन व्यावसायिक आस्थापने वैध परवान्याशिवाय सुरू असल्याचे आढळले. तसेच स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ उपाहारगृहांना नोटिसा बजावण्यात आल्या. तपासणीत अन्नाची अयोग्य साठवणूक, कीटकांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ पद्धतीने अन्न हाताळणे, कृत्रिम रंगांचा वापर आणि कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट अशा गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.