Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa Government: विशेष साहाय्य योजना; साडेसहा वर्षांत घेतले 5,133 कोटींचे कर्ज; सरकारच्या बिनव्‍याजी कर्जात दरवर्षी वाढ

Goa SASCI Loan: राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य योजनेअंतर्गत (एसएएससीआय) गेल्‍या साडेसहा वर्षांत गोव्‍याने ५,१३३ कोटींचे कर्ज केंद्र सरकारकडून घेतले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य योजनेअंतर्गत (एसएएससीआय) गेल्‍या साडेसहा वर्षांत गोव्‍याने ५,१३३ कोटींचे कर्ज केंद्र सरकारकडून घेतले आहे. दरवर्षी या कर्जात वाढ झाल्‍याचे केंद्रीय वित्त राज्‍यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

‘राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष साहाय्य’ ही केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांसाठी ५० वर्षांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.

देशातील आर्थिक वाढीला गती देणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे, राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चात वाढ करण्यास मदत करणे या हेतूने ही योजना सुरू करण्‍यात आली आहे.

योजनेअंतर्गत राज्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड ५० वर्षांच्या कालावधीत करायची असते. हे कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त असते. ऑप्टिकल फायबर केबल आणि पर्यटन केंद्रांचा विकास यांसारख्या विशिष्ट क्षेत्रांसाठी देखील यातून स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT