Goa Government: नारी शक्ती ते गरीब कल्याण! मुख्यमंत्री सावंतांनी मांडली भाजप सरकारच्या कारभाराची 4 प्रमुख सूत्रे; 12 वर्षांच्या विकासाचे भव्य प्रदर्शन

Goa Government Development Exhibition: केंद्र आणि राज्‍य सरकारची प्रत्‍येक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्‍याचे पूर्ण प्रयत्‍न राज्‍य सरकार करीत आहे.
Goa Government Development Exhibition
Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र आणि राज्‍य सरकारची प्रत्‍येक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्‍याचे पूर्ण प्रयत्‍न राज्‍य सरकार करीत आहे. त्‍याच अनुषंगाने केंद्रातील भाजप सरकारला बारा वर्षे पूर्ण झाल्‍यानिमित्त पणजीसह मडगाव, म्‍हापसा आणि कुडचडे बसस्‍थानकांवर माहिती आणि प्रसिद्धी खात्‍यामार्फत आयोजित ‘१२ साल विश्‍‍वास के, विकास के, जन कल्‍याण के’ या प्रदर्शनाचा आणि प्रत्‍येक योजनेचा सर्वांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मंगळवारी केले.

पणजी बसस्‍थानकातील प्रदर्शनाच्‍या उद्‍घाटनानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. आमदार राजेश फळदेसाई, रुडॉल्‍फ फर्नांडिस व इतर मान्‍यवर यावेळी उपस्‍थित होते. नारी शक्‍ती, युवा शक्‍ती, किसान शक्‍ती आणि गरीब कल्‍याण या तत्त्‍वांवर केंद्र आणि राज्‍य सरकार चालत आहे. या सर्व घटकांना सर्वांगीण विकास साधण्‍याचा प्रयत्‍न सरकारकडून सुरू असल्‍याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

Goa Government Development Exhibition
Griha Adhar Scheme: 'गृहआधार'चे अर्थसाहाय्‍य लवकरच 2 हजार, सरकारकडून हालचाली सुरू; मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्‍कामोर्तब

गोमंतकीयांसाठीच प्रदर्शन!

केंद्र आणि राज्‍य सरकारने राबवलेल्‍या योजनांचा तळागाळापर्यंत प्रचार आणि प्रसार व्‍हावा, याच उद्देशाने पणजीसह मडगाव, म्‍हापसा आणि कुडचडे बसस्‍थानकांवर या प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. गोमंतकीय जनतेने या प्रदर्शनाचा लाभ घ्‍यावा, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Revised Kamdhenu Scheme
Goa Slum Rehabilitation
Goa Warkari Tradition History Before Portuguese
cm pramod sawant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com