Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'विरोधकांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा'! मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ भाजपचा पलटवार

Goa BJP: ‘राज्‍य सरकारचे काम उत्तमरीत्‍या सुरू असल्‍याने विरोधक व्‍यथित झाले आहेत. त्‍यामुळेच नोकरी घोटाळ्याच्‍या अनुषंगाने मुख्‍यमंत्री व त्‍यांच्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींवर बिनबुडाचे आरोप सुरू आहेत’, असे आज भाजपच्‍या वतीने सांगण्‍यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa BJP Press Conference To Support CM Against Cash For Job Allegations

पणजी: ‘राज्‍य सरकारचे काम उत्तमरीत्‍या सुरू असल्‍याने विरोधक व्‍यथित झाले आहेत. त्‍यामुळेच नोकरी घोटाळ्याच्‍या अनुषंगाने मुख्‍यमंत्री व त्‍यांच्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींवर बिनबुडाचे आरोप सुरू आहेत’, असे आज भाजपच्‍या वतीने सांगण्‍यात आले.

पणजी येथे भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सुभाष फळदेसाई, प्रवक्‍ते गिरिराज पै वेर्णेकर, आमदार संकल्‍प आमोणकर व आमदार केदार नाईक उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नीवर केलेल्या आरोपांवरून विरोधकांना भाजप नेत्यांनी आज थेट आव्हान दिले आहे. केवळ आरोप न करता पुरावे द्या, अन्यथा गप्प बसा, असा दमच त्‍यांनी विरोधकांना भरला. भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर सडकून टीका केली. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला निष्प्रभ करत भाजपने पुराव्यांच्या जोरावर त्यांचा पर्दाफाश करण्याचे ठाम इशारे दिले आहेत.

फळदेसाई म्हणाले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी कर्मचारी भरती आयोगाची स्थापना केली. तसेच जमीन घोटाळ्याच्या तपासासाठी खास आयोग स्थापन करून अनेक प्रकरणे उजेडात आणली.

त्यांनीच ‘जॉब फॉर स्कॅम’ प्रकरणात पहिली तक्रार नोंदवली. विरोधक दिल्लीमध्ये पत्रकार परिषदा घेऊन आणि पंतप्रधानांना पत्र पाठवून नाहक आरोप करत आहेत. विरोधकांकडे आरोपांचे पुरावे नसतील, तर त्यांनी हवेत बाण मारणे थांबवावे.

१३० कोटींच्‍या घोटाळ्यावर बोला

1.विरोधी आमदाराच्या जवळच्या व्यक्तीने फातोर्डा ते लंडन १३० कोटी रुपयांचा घोटाळा केला‌‌ आहे त्यावर विरोधकांनी बोलावे. काँग्रेसचे आमदार ‘सेक्स स्कँडल’मध्ये अडकलेत त्यावर बोलावे.

2. आमदार‌ अडकले म्हणूनच त्यांनी पैसे दिले‌ ना अशी विचारणा करून वेर्णेकर म्हणाले, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर जे आरोप केले होते, त्यावेळी त्यांना हवे ते मिळाले नाही म्हणून केले होते. त्यांना कुणीच गंभीरपणे घेत नाही, असेही यावेळी भाजप नेत्यांनी सांगितले.

घोटाळेबाजांनी वैयक्तिक चारित्र्यहनन करू नये

मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, ‘काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या घोटाळ्यांत अडकलेल्या, तुरुंगवास भोगून जामिनावर सुटलेल्या नेत्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नीवर पुरावे नसताना सुरू केलेले आरोप त्वरित थांबवावेत. पुरावे असल्यास ते न्यायालयात सादर करावेत. खोटे आरोप करून वैयक्तिक चारित्र्यहनन करू नये’. फसवणुकीचे प्रकरण मुख्‍यमंत्र्यांच्‍या प्रयत्‍नांमुळे उघडकीस आले, असाही पुनरुच्‍चार करण्‍यात आला.

चोरांच्या उलट्या बोंबा!

भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ‘पुरावे नसताना खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांना हे महागात पडेल. तुरुंगवास भोगलेल्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन केलेले आरोप चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. काँग्रेसचे आमदार सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याचे उघड झाले आहे. त्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, असे वेर्णेकर म्हणाले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील भाजप सरकारला भक्कम बहुमत मिळवून दिले. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर डाग लावण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत. ‘इंडिया’ आघाडीत आणि गोव्यातील विरोधकांमध्ये एकमत नसल्याने ते वैयक्तिक आरोप करत आहेत.
-संकल्प आमोणकर, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT