Goa BJP late in announcing list of candidates Dainik Gomantak
गोवा

उमेदवार यादी घोषित करण्यास भाजपची वेळकाढूपणाची भूमिका..!

इतर पक्षांपूर्वी उमेदवारांची यादी घोषित करण्यात आघाडीवर असणाऱ्या भाजपने यावेळी मात्र बरीच सावधगिरी बाळगली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी गोव्यातील निवडणुकीची (Goa Assembly Election 2022) तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षांना उमेदवारांची यादी जाहीर करण्याची घाई लागली आहे. आम आदमी पक्षाने आज 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसने आतापर्यंत 14 उमेदवारांची घोषणा केली आहे. तृणमूल-मगोने युती केल्याने त्यांच्या उमेदवार यादीला विलंब होत आहे. भाजपचीही यादी आठवडाभरात निश्‍चित होण्याची शक्यता आहे.(Goa BJP is late in announcing the list of candidates)

काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे आतापर्यंत 16 उमेदवार जाहीर झाले आहेत. गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षाला मये व फातोर्डा मतदारसंघ दिला आहे. जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी आलेक्स रेजिनाल्ड हे तृणमूलमध्ये (TMC) गेले, तर प्रतापसिंह राणे यांनी राजकीय निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसचे (Congress) सध्या 14 उमेदवार घोषित झाले आहेत. आज रात्री उशिरा त्यांची दुसरी यादी घोषित झाली आहे. त्यामध्ये जितेंद्र गावकर (पेडणे), रुडॉल्फ फर्नांडिस (सांताक्रुझ), राजेश फळदेसाई (कुंभारजुवे), मनीषा शेणवी उसगावकर (वाळपई), विरियतो फर्नांडिस (दाबोळी), ओलांसिओ सिमोईश (कुठ्ठाळ्ळी) व माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो (नावेली) यांचा समावेश आहे. तिसरी किंवा अंतिम यादी 15 किंवा 16 तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे. मगोने तृणमूलशी युती केली आहे. पूर्वी त्यांच्या निश्‍चित असलेल्या 12 उमेदवारांपैकी दोघेजण भाजपमध्ये गेले असले तरी 12 मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याबाबत मगो ठाम आहे.

इतर पक्षांपूर्वी उमेदवारांची यादी घोषित करण्यात आघाडीवर असणाऱ्या भाजपने (BJP) यावेळी मात्र बरीच सावधगिरी बाळगली आहे. काही आजी-माजी आमदार तसेच इच्छुक उमेदवारांना डावलून हल्लीच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे भाजपचे काही नेते व कार्यकर्ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी उमेदवार यादी घोषित करण्यास भाजपने वेळकाढूपणाची भूमिका घेतल्याचे बोलले जाते. 20 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळामार्फत येत्या आठवड्याभरात उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

गोवा फॉरवर्डला दोन जागा

काँग्रेसचे युतीतील भागीदार असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाला फातोर्डा आणि मये या दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी ट्विटद्वारे ही घोषणा केली आहे. उमेदवारांची तिसऱ्या टप्प्याची यादी जाहीर करताना फॉरवर्डला आणखी दोन जागा मिळू शकतात, असे काँग्रेस सूत्रांकडून समजते.

नुवे, वेळ्ळीची उमेदवारी गुलदस्त्यात

काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा यांनी ज्या नुवे मतदारसंघावर दावा केला आहे आणि दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस यांनी वेळ्ळी मतदारसंघातील उमेदवार कोण हे अद्याप जाहीर न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Fishing: 'बोट्स माझ्या नावावर नाहीत!' आमदार नाईक आक्रमक, सीझ ट्रॉलर्सच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, ''माफी मागा!''

IND VS SA Head to Head: 94 एकदिवसीय सामने... भारत- आफ्रिकामध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेडमध्ये कोणाची आकडेवारी भारी?

Mahatma Jyotirao Phule: 1869 साली छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला गेला; समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा फुले

Goa Live News: भाजप उमेदवारांची यादी लवकरच! मगोप सोबत जागावाटपावर चर्चा सुरू: दामू नाईक

Panaji Air Quality: धोक्याची घंटा! राजधानीची हवा झाली 'असुरक्षित'; नोव्हेंबर महिन्यात पणजीचा AQI 176 वर

SCROLL FOR NEXT