निवडणुकीच्या मुहूर्तावर राज्यात नोकऱ्यांची खिरापत वाटप

सुष्मिता देव बरसल्या: भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र
Goa Job Scam
Goa Job Scam Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात भाजप सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावरच नोकऱ्याची खिरापत (Goa Job Scam) का वाटली? नोकऱ्याचे गाजर दाखवून निवडणुकीत लाभ उठवण्याचा डाव आहे. पण स्वाभिमानी गोमंतकीय जनता त्यांच्या भूलथापांना भूलणार नाही, असे राज्यसभा खासदार आणि तृणमूलच्या गोवा सहप्रभारी सुष्मिता देव बाणावलीतील पत्रकार परिषदेत बरसल्या. त्यांच्या सोबत चर्चिल आलेमाव उपस्थित होते. (criticism of BJP government by Sushmita Dev on goa job scam)

Goa Job Scam
बाबुश मोन्सेरात यांच्या अचानक निर्णयामुळे राज्यात उलटसुलट चर्चा

यावेळी तृणमूलपक्षातर्फे भाजपला (BJP) राज्यात आणि केंद्रात पराभूत करण्याची शपथ घेण्यात आली. प्रमोद सावंत सरकारने आता निवडणूक तोंडावर आल्यावर नोकऱ्या देणे सुरू केले, मात्र मागच्या पाच वर्षात त्यांनी या नोकऱ्या का दिल्या नाहीत? असा सवालही देव त्यांनी केला. चर्चिल आलेमाव यांच्या सक्षम नेतृत्वाचे कौतुक करताना सुष्मिता देव म्हणाल्या, ते जनसामान्यांचे नेते आहेत आणि ते तृणमूलमध्ये (TMC) सामील झाल्याचा मला आनंद आहे. त्यांच्या उपस्थितीने, तृणमूल तळागाळात मजबूत होईल आणि आमच्या योजना पूर्णतः कार्यान्वित करण्यास सक्षम होईल.

तृणमूल गोव्यातील (Goa) प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला दरमहा 5000 रुपयांचे हमी आधार उत्पन्न समर्थन देईल. इतकेच नाही तर गोव्यातील युवक रु. 20 लाखाचे तारण-मुक्त कर्ज या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने हे केले गेले आहे. चर्चिल आलेमाव यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केल्याबद्दल ''आप''चे उमेदवार व्हेन्झी व्हिएगास यांचा समाचार घेत तिने त्यांना गैरकारभार सिद्ध करणारी कागदपत्रे दाखवण्याचे आव्हान दिले. तिने पुढे इशारा दिला की, तृणमूल नेत्याबद्दल काहीही बोलण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा आम्ही तुम्हाला बदनामीसाठी गुन्हेगारी न्यायालयात खेचू असा इशारा त्यांनी दिला.

Goa Job Scam
मायकल लोबोंचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा

तृणमूलचे सरकार : गोव्यात तृणमूलच सरकार स्थापन करेन, असा विश्वास चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘मी लोकनेता आहे आणि गोव्यातील जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. भाजपचा गोव्यातच नाही, तर केंद्रातही पराभव करायचा आहे. ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये तीन वेळा मोदी-शाह जोडीचा पराभव केला आहे आणि गोव्यातही तेच होईल. गोवा तृणमूलच्या पुढाकाराने राज्यात समृद्धी आणणार आहे.

तुम्ही कुठे होता?

गोवा तृणमूलने त्यांच्या योजनांची कॉपी केल्याचा भाजपचा आरोप खोडताना देव म्हणाल्या, भाजप गृह आधार योजनेंतर्गत महिलांना 1200 रुपये देण्याचा दावा करत आहे, परंतु वास्तविकता दुसरेच वर्तवत आहे. भाजपने आधी स्वत:च्या अपयशाकडे लक्ष द्यावे आणि मग विकासाबाबत बोलावे. गोव्यातील तरुणांना 30 हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरही त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, ''सावंतांनी गेल्या पाच वर्षांत या नोकऱ्या का नाही दिल्या नाहीत, गोव्यातील तरुणांना नोकऱ्या हव्या असताना तुम्ही कुठे होता?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com