Aleixo Sequeira | Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: ‘ना घर का, ना घाट का’, संकल्‍प आमोणकरांची आलेक्‍स सिक्‍वेरांवर मात!

Goa BJP: काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्‍या नवागतांपैकी एकालाच मंत्रिपद देण्‍याचे निश्‍चित झाले होते.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्‍या नवागतांपैकी एकालाच मंत्रिपद देण्‍याचे निश्‍चित झाले होते. त्‍या पदासाठी आलेक्‍स सिक्‍वेरा यांच्‍या नावावर मोहोर बसली असली तरी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने विरोध केल्‍याने त्‍यांच्‍या जागी आता मुरगावचे आमदार संकल्‍प आमोणकर यांची वर्णी लागू शकते.

आलेक्‍स सिक्‍वेरा यांच्‍या नावाबाबत भाजपामध्‍येच अनेकजण, विशेषतः सुकाणू समितीचे सदस्‍यही नाराज आहेत. एका ख्रिश्‍‍चन नेत्‍याला, तेही सासष्‍टीमधून मंत्रिमंडळात स्‍थान दिल्‍यास त्‍याचा भाजपला कोणताही फायदा होणार नाही, असे त्‍यांनी पक्ष नेतृत्‍वास पटवून देण्‍यात यश मिळवले आहे.

या संदर्भात भाजपातील एक दणकट गट सक्रिय झाला असून, नीळकंठ हळर्णकर यांना मंत्रिमंडळातून डच्‍चू दिल्‍यास त्‍यांच्‍या जागी खारवी समाजातीलच एक नेता मंत्रिपदी यावा, असा विचार त्‍यांनी पुढे आणला आहे.

वास्‍तविक, 12 मंत्र्यांना शपथ दिली, त्‍यात सुभाष फळदेसाई यांची वर्णी सर्वांत शेवटी लागली होती. लोकसंख्‍येच्‍या मानाने मंत्रिमंडळात सध्‍या तीन मराठा प्रतिनिधी आहेत व पहिल्‍या दोन क्रमांकाचे मंत्री मराठाच आहेत. मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत व त्‍यांच्‍या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री विश्‍वजीत राणे यांच्‍याकडे सर्वांत महत्त्‍वाची खाती आहेत.

नीळकंठ हळर्णकरांना डच्‍चू दिल्‍यास खारवी समाजातील नेत्‍यालाच मंत्रिपद मिळावे, असा विचार पुढे आल्‍याने मुरगावचे आमदार संकल्‍प आमोणकर यांच्‍या नावावर नेत्‍यांची मोहोर बसू शकते. तसे झाल्‍यास खारवी समाजावर अन्‍याय होणार नाही व संघाच्‍या नेत्‍यांचाही आक्षेप राहणार नाही.

मुख्‍यमंत्र्यांच्‍या पाठिंब्‍यामुळे सर्वांत शेवटच्‍या स्‍थानावर असले तरी सुभाष फळदेसाई यांचे पद शाबूत राहणार असल्‍याचे संकेत मिळत आहेत. मंत्रिपद हुकल्‍यास आलेक्‍स सिक्‍वेरा जास्‍तीत जास्‍त राजीनामा देऊ शकतात. परंतु, तेवढाही राजकीय धोका पत्‍करणे त्‍यांना शक्‍य होणार नाही.

  • सूत्रांच्‍या मते सिक्‍वेरा यांना कुणाही भाजपा नेत्‍याने मंत्रिमंडळात समावेशाचा शब्‍द दिला नव्‍हता.

  • सिक्‍वेरा हे भाजपात येण्‍याबाबत साशंक असल्‍याने दिगंबर कामत यांनी हस्‍तक्षेप करून आपले मंत्रिपद त्‍यांना देण्‍याचे अभिवचन दिले होते.

  • मंत्रिमंडळ बदलास उशीर झाल्‍याने सिक्‍वेरा हल्‍लीच पक्षाचे प्रभारी सी.टी. रवी यांना भेटले. त्‍यावेळी ‘मी काही तुम्‍हाला शब्‍द दिला नव्‍हता. तुम्‍हाला ज्‍यांनी शब्‍द दिला त्‍यांनाच विचारा’, असे सांगून रवी यांनी त्‍यांची परत पाठवणी केली.

  • सध्‍या सिक्‍वेरा हात चोळीत बसले असून, मतदारसंघात त्‍यांच्‍याबद्दल कमालीचा रोष आहे. भाजपाने त्‍यांना अस्‍पृश्‍‍य मानले तर ‘ना घर का, ना घाट का’, अशी त्‍यांची स्‍थिती बनेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT