Goa Bison Attack Dainik Gomantak
गोवा

Goa Bison Attack: गव्याच्या धडकेत सुळकर्णे पिर्ला येथील तरूणाचा दुर्दैवी मृत्यू; रात्री कामावरून घरी परतताना घटना

कुटूंबाला भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी

Akshay Nirmale

Goa Bison Attack: गव्याने धडक दिल्याने सुळकर्णे पिर्ला येथील एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. सदानंद गावकर असे या तरूणाचे नाव आहे.

सदानंद गावकर हे सुळकर्णे पिर्ला येथीलच रहिवासी होते. ते एका खासगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मंगळवारी रात्री ते कामावरून घरी परतत असताना गावाजवळ आल्यावर रस्त्यावरच त्यांना गव्यांचा कळप दिसला.

अचानक गव्यांचा कळप सामोरा आल्याने गांवकर यांना काही सुचेना. इतक्यात एका गव्याने त्यांना जोरात धडक दिली. त्यामुळे ते उडून झाडावर पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रात्री एक वाजता त्यांची दुचाकी लोकांना आढळून आली. तेव्हाच त्यांचा मृत्यू झाल्याचेही ग्रामस्थांच्या लक्षात आले.

गांवकर हे विवाहीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावांत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी प्रशासनाकडे गांवकर कुटूंबाला भरपाई देण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT