Francisco Sardinha: माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार चर्चिल आलेमाव यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी चर्चिल हे चंद्रावर निवडणूक लढवू शकतात आणि जिंकूही शकतात कारण तिथे त्यांना कुणी विरोधकच नाही, असा टोला लगावला आहे.
खासदार सार्दिन म्हणाले की, आलेमाव हे केवळ चंद्रावरच निवडणूक जिंकू शकतात. कारण तिथे त्यांना कुणीही विरोधक नाही. मी मागेच बोललो होतो की, आलेमाव हे लोकसभा निवडणूक लढवू शकतात.
ते भाजप पुरस्कृत उमेदवार असतील. आणि भाजप त्यांचा वापर केवळ मतविभागणीसाठी करेल.
दरम्यान, सध्या देशभरात सुरू असलेल्या 5 राज्यातील निवडणुकांबाबत बोलताना सार्दिन म्हणाले की, या पाच पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेस सत्ते येईल.
सार्दिन म्हणाले, राज्य सरकारने तत्काळ संजीवनी साखर कारखाना सुरू केला पाहिजे आणि कामगारांना दिलासा दिला पाहिजे. दोन वर्षांपासून हे कामगार विनाकारण मनस्ताप सहन करत आहेत.
आम्हाला इथेनॉल नको आम्हाला साखर कारखानाच हवा आहे, असेही सार्दिन यांनी ठामपणे स्पष्ट केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.