गोवा

Goa News: फोंड्यातील सहा पाणथळांसाठी मंडळाकडून मसुदा अधिसूचित!

Goa News: मसुद्यावरील सूचना आणि आक्षेप नोंदवण्यासाठी लोकांना 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा जैवविविधता मंडळाने 35 ठिकाणी जलस्रोत असलेल्या जमिनी पाणथळ म्हणून अधिसूचित करण्याची योजना आखली आहे. यापैकी 8 पाणथळ ठिकाणे अधिसूचित करण्यात आली आहे. आणखी 6 पाणथळ ठिकाणांच्या जागांचा मसुदा अधिसूचना जारी केली आहे.

दरम्यान, या मसुद्यावरील सूचना व आक्षेप नोंदवण्यासाठी लोकांना 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या पाणथळांच्या जागा बहुतांश फोंडा तालुक्यातील आहेत, अशी माहिती मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांनी दिली.

जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार जैवविविधता मंडळासह जलस्रोत असलेल्या क्षेत्रांना पाणथळ क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याची प्रक्रिया करत आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचनेनुसार राज्यात किमान 35 पाणथळ अधिसूचित करण्याची आवश्‍यकता आहे.

लवादाने केलेल्या या निरीक्षणानंतर राज्यात ज्या ठिकाणी जलस्रोत आहेत त्यांचे संरक्षण करण्यासाठी ते पाणथळ म्हणून अधिसूचित करण्याची प्रक्रिया जलसंपदा खात्याच्या मदतीने सुरू झाली आहे. एखादी जागा पाणथळ म्हणून अधिसूचित झाली, की त्या भागात बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही. मात्र शेती व्यवसायासाठी मुभा असणार आहे, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

एखाद्या ठिकाणी जमीन ओलसर म्हणून अधिसूचित झाल्यानंतर त्या परिसरातील लोकांना शेती तसेच सुरू असलेल्या कामे सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली जाईल. मात्र या अधिसूचित केलेल्या जागेसंदर्भात लोकांच्या सूचना व हरकती नोंदवण्यासाठी कायद्यानुसार 60 दिवसांचा अवधी देणे क्रमप्राप्त आहे व ती प्रक्रिया पूर्ण केल्यावर ती जागा पाणथळ म्हणून घोषित केली जाईल.

हरकतीसाठी 60 दिवस!

सध्या राज्यात अनेक ठिकाणी जलस्रोत आहेत ते नष्ट होत आहेत. त्याचे पुनर्वसन करण्याबरोबरच राज्यातील पाणथळाचा शोध घेण्याचे प्रयत्न मंडळातर्फे सुरू आहेत, अशी माहिती अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, एकदा ठिकाणे ओलसर म्हणून अधिसूचित झाल्यानंतर, लोकांना कृषी आणि चालू क्रियाकलाप करण्याची परवानगी दिली जाईल. लोकांना उपक्रम, सूचना आणि हरकती नमूद करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Power Cut: दक्षिण गोव्यात पाच तास अंधार; शेल्डे उपकेंद्रातील तीन ट्रान्सफॉर्मर एकाचवेळी ट्रिप

Horoscope: मेषसह 4 राशींसाठी गुरूवारचा दिवस खास! रखडलेली कामे मार्गी लागणार, आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

SCROLL FOR NEXT