Goa First: गोवा शिपयार्डची 'ती' भिंत हटवणे आवश्यक

गोवा शिपयार्ड कंपनीने संरक्षण क्षेत्राच्या नावाखाली राष्ट्रीय महामार्गाचे उल्लंघन केले
Goa Shipyard
Goa Shipyard Dainik Gomantak

वास्को: गोवा शिपयार्ड कंपनीने सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे वास्कोतील जनता अनेक वर्षांपासून पाहत आहे. शिपयार्डने राष्ट्रीय महामार्गापासून आपली संरक्षक भिंत तीन मिटर आत घेणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही बाजूला फूटपाथ नसल्याने पादचार्‍यांना रस्ता ओलांडताना खास करून शालेय विद्यार्थी, लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो आहे.

(Goa First NGO alleged that the Goa Shipyard Company has encroached on road)

गोवा शिपयार्ड कंपनीचे चंप्पा व मोगरा गेट पर्यन्त सुमारे शंभर मिटर अतिक्रमण केली असल्याची तक्रार बिगर सरकारी संस्था गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, दक्षिण गोवा वाहतुक पोलिस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरगाव उपजिल्हाधिकारी ,मुरगाव नगरपालिका यांच्याकडे केली आहे.

Goa Shipyard
'PFI'ला पैसे पुरवण्याच्या आरोपाखाली फातोर्ड्यातील एकावर गुन्हा दाखल

गोवा शिपयार्ड कंपनी ही मिनीरत्न कंपनीपैकी एक असून संरक्षण उत्पादनाव्दारे भारतीय संरक्षण क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. पण या कंपनीने संरक्षण क्षेत्राच्या नावाखाली राष्ट्रीय महामार्ग नियमांचे उल्लंघन केले आहे. कारण महामार्ग कायद्यानुसार रस्त्यापर्यन्त 3 मीटरचा धक्कादायक क्षेत्र सोडणे आवश्यक आहे.

Goa Shipyard
MLA Antonio Vaz: कुठ्ठाळीतील पाणी समस्या सोडवणार

गोवा शिपयार्ड कंपनीत कामानिमित्त येणारी आपली वाहने महामार्गावर व समोरील प्रवाशांना बांधलेले बस स्थानक परिसरात पार्क केली जातात, यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढताना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी संबंधीत विभागाने येथे बेशिस्त वाहने पार्क करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी गोवा फर्स्टचे निमंत्रक सोनुर्लेकर यांनी केली आहे.

हे अतिक्रमण असल्याने तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोनुर्लेकर यांनी केली आहे. सदर भिंत महामार्गापासून तीन मीटर आत घेतल्यास याचा गोवा शिपयार्डच्या सुरक्षितेला कोणताच धोका निर्माण होणार नाही. कारण शिपयार्डच्या सर्व बाजूंनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान 24 तास पहारा देत असल्याने संरक्षक भिंत पाडून आत घेण्यास संबंधीत विभागाकडे परशुराम सोनुर्लेकर यांनी मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com