School Program  Dainik Gomantak
गोवा

डिचोलीतील ‘कराओके’ वरील ‘उडान’ एकदम 'ओके'; मुलांच्या अविष्काराने उपस्थित भारावले

‘कराओके’ गायन बहारदार ः विशेष मुलांच्या कलाविष्काराचे दर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

School Program ''उडान'' हा पहिलावहिला विशेष मुलांचा ‘कराओके’ गायनाचा कार्यक्रम डिचोलीत रंगला. विशेष मुलांच्या अविष्काराने उपस्थित भारावून गेले.

डिचोली सम्राट क्लबतर्फे गुरुवारी (ता.१०) वृंदा दीनानाथ तारी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘देश प्रथम’ या विषयानुरूप नाविन्यपूर्ण संकल्पनेतील हा कार्यक्रम होता.

माजी शिक्षक व ज्येष्ठ प्रवचनकार दीनानाथ तारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सम्राट क्लबचे अध्यक्ष नीलेश टोपले, खजिनदार शेखर नाईक, समन्वयक भारत चणेकर, केशव सेवा साधना शाळेचे व्यवस्थापक मकरंद कामत ‘उडान’ या कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. मंजिरी जोग आदी उपस्थित होते.

सामाजिक संस्थांनी आजच्या विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दीनानाथ तारी यांनी यावेळी बोलताना केले. विशेष मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यासपीठ मिळावे.

ही उडान कार्यक्रमामागील संकल्पना आहे. असे डॉ. मंजिरी जोग यांनी सांगितले. नीलेश टोपले यांनी स्वागत केले. प्रा. प्रवीण सावंत यांनी सूत्रसंचालन केले. भारत चणेकर यांनी आभार मानले.

‘दिल दिया है, जान भी देंगे’ ला वन्समोअर

डॉ. मंजिरी दत्तप्रसाद जोग यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीतील केशव सेवा साधना या शाळेतील रुद्रेश गाड, विभा काणेकर, यश कळंगगुटकर यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन उपस्थितांकडून दाद मिळवली. विभा काणेकर हिने‘दिल दिया है, जान भी देंगे’ या गीताला वन्समोर मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Indians: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! महेला जयवर्धनेनं सोडलं मुख्य प्रशिक्षकपद; IPL 2027 आधी मोठा बदल

Organic Agriculture: गोव्यात 10 टक्के क्षेत्रातही सेंद्रिय शेती नाही! रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगत उदय प्रभुदेसाई यांचे आवाहन

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

VIDEO: मृतदेहांचं पोस्टमार्टम होणाऱ्या खोलीत दारूची पार्टी! डॉक्टराचा व्हिडिओ व्हायरल, प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT