Banastarim Bridge Accident: बाणस्तारी येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात तिघेजण ठार, तर चौघेजण जखमी झाले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून अपघाती लाभ दिला जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज (शनिवारी) दिले.
फोंड्याहून भरधाव येणाऱ्या (जीए - 07 - के - 7311) मर्सिडीज गाडीने सुरवातील तीन दुचाक्या आणि नंतर तीन कारगाड्यांना ठोकल्याने हा विचित्र अपघात झाला होता.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी संध्याकाळी बाणस्तारी दुर्घटनेत जखमी झालेल्यांची गोमेकॉत भेट घेऊन विचारपूस केली. अपघातात जखमी झालेले तिघांची तब्येत सध्या बरी असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. तसेच, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
या अपघातात दिवाडी येथील दुचाकीस्वार सुरेश फडते (वय 58) व भावना फडते (वय 52), तर अन्य एका दुचाकीवरील फातोर्डा येथील अनुप कर्माकर (वय 26) हे ठार झाले आहेत.
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज कारगाडीने सुरवातीला बाणस्तारी पुलाजवळ थांबलेल्या दुचाकींना जोरदार ठोकर दिली व नंतर चुकीच्या ‘वनवे’त घुसून अन्य तीन कारगाड्यांना जोरदार ठोकर दिली.
दरम्यान, या अपघातात फडते दांपत्यांचा मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुले पोरकी झाली. तर, वनिता भंडारी (वय 21, रा. सांताक्रूझ-फोंडा), शंकर हळर्णकर (वय 67, रा. बाणास्तरी), राज माजगावकर (वय 27, रा. ताळगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.