Press Conference In Bicholim Congratulations Govt Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: कृषी विधेयकामुळे हरित क्रांती शक्य

सरकारचे अभिनंदन : डिचोलीत पत्रकार परिषद

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी गोवा विधानसभेत संमत झालेले कृषी विधेयक कृषी क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरणार आहे. कृषीप्रधान गोवा हरितक्रांतीने पुन्हा एकदा स्वयंपूर्ण बनेल. असा विश्वास गोवा स्टेट अग्रिकल्चरल अँड लाईव्ह स्टॉक मार्केटिंग बोर्डचे उपाध्यक्ष प्रेमानंद म्हांब्रे यांच्यासह अन्य संचालकांनी व्यक्त केला आहे. विधेयक संमत झाल्याने गोवा सरकारचे त्यांनी अभिनंदनही केले आहे.

शनिवारी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा शेतकरी विश्र्वंबर गावस, संचालक तुळशीदास गावकर, विश्वास चोडणकर, मये भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर आदींची उपस्थिती होती. प्रेमानंद म्हांबरे यांनी कृषी विधेयकाविषयी सविस्तर माहिती पत्रकारांना दिली.

राज्यातील भातशेती वाचवणे काळाची गरज असून या विधेयकामुळे ते शक्य होणार आहे. गोव्याला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. सामूहिक शेतीला उत्तेजन, कृषी उत्पादनाला आधारभूत किंमत, बाजारपेठ यातून शेतकरी समृद्ध होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शेतकऱ्यांमध्ये उत्साह

शेतजमीन शेतीसाठीच देण्यात येईल. खासगी कंपन्या, शेतकरी एकत्र येऊन सामूहिक शेती करू शकतील. भातशेती जमीन विक्रीला आळा बसेल. भात शेती जमिनीचा वापर शेतीसाठीच करावा लागेल. अशी तरतूद या विधेयकात करण्यात आल्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होईल. सरकारच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह पसरला असल्याचे श्री. म्हांब्रे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT