Dicholi: Shantadurga Temple Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोली शांतादुर्गा देवस्थानात आषाढी एकादशीला भजनी सप्ताह

गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात (Shantadurga Temple) येत्या मंगळवारी आषाढी एकादशी विविध कार्यक्रमांनिशी साजरी करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात (Shantadurga Temple) येत्या मंगळवारी आषाढी एकादशी विविध कार्यक्रमांनिशी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त चोवीस तास अखंड भजनी सप्ताह होणार आहे. श्री शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्टतर्फे हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी देवीस अभिषेक आदी विधी पार पाडल्यानंतर देवीची सजावट करण्यात येणार आहे.

दुपारी 12.30 वा. चार चौगुले ग्रामस्थ गावकर मंडळीकडून समई प्रज्वलित करून अखंड भजनी सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. बुधवारी दुपारी 12.30 वा ग्रामस्थ गावकर, भाविक व महिला दिंडी पथकासह श्री विठ्ठलनामाच्या गजराने मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून मंदिरात आल्यानंतर पुजाऱ्यांकडून देवीस व पंचायतन देवदेवतांना नैवेद्य, आरती, गाऱ्हाणे व तीर्थप्रसाद होणार आहे. रात्री 7.30 वा. पुराण वाचन, धुपारती आदी विधी झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.

भजनी सप्ताह

चोवीस तास चालणाऱ्या भजनी सप्ताहात ग्रामस्थ गावकर, देव बंदरकर (दाऱ्यातील) भजनी मंडळ, श्री. संदीप वसंत च्यारी आणि कुटुंबिय, श्री म्हात्राई महिला भजनी मंडळ, कु. निकिता श्यामू गावकर आणि कुटुंबिय, श्री शांतादुर्गा महिला दिंडी मंडळ, सुरज सहकारी आणि भजन मंडळ, गावकरवाडा बाल हौशी घुमट आरती मंडळ, स्थानिक भजनी कलाकार, श्री शांतादुर्गा महिला दिंडी मंडळ आणि आनंदी महिला भजनी मंडळातर्फे भजन सादर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT