डिचोली: 'कोविड'च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर डिचोली रोटरी क्लबकडून केशव सेवा साधना स्टेप-अप कोविड निगा केंद्राला 'मॉनिटर सिस्टिम' हे उपकरण देण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात झालेल्या औपचारिक कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष श्यामकांत मुळगावकर यांनी आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्याकडे हे उपकरण सुपूर्द केले. 'कोविड'च्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने त्याची पूर्वतयारी म्हणून हे उपकरण देण्यात आले आहे. (Bicholim Rotary Club has donated a 'Monitor System' to the Step-Up Covid Center.)
यावेळी डॉ. शेखर साळकर, रोटरी क्लबचे सचिव पंकज तेली, माजी अध्यक्ष सुदत्त मांद्रेकर आणि सरगम फळारी उपस्थित होते. 'कोविड' ची तिसरी लाट येण्याची संभावना असल्याने या लाटेचा सामना करण्यासाठी रोटरीकडून या उपकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपकरणाव्दारे लहान मुलांची ऑक्सिजन पातळी तसेच दाब तपासता येणार आहे. उपकरण दिल्याबद्दल स्टेप-अप कोविड निगा केंद्राचे कन्सल्टंट डॉ.शेखर साळकर यांनी रोटरी क्लबला धन्यवाद दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.