Goa Mining Case Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Case: खाणप्रकरणी सांगेत तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Goa Mining Case: चिरेखाणीबाबत केपे पोलिसांनी तिघांविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Mining Case: सांगे तालुक्यातील कोळंब-पणसुले येथील कातळशिल्प असलेल्या भागात झालेल्या बेकायदेशीर चिरेखाणीबाबत केपे पोलिसांनी तिघांविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. कातळशिल्प परिसरातील बेकायदेशीर चिरेखाणीप्रकरणी गोवा खंडपीठाने स्वेच्छा याचिका दाखल करून घेतली आहे.

काल ही याचिका खंडपीठासमोर आली असता ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी बाजू मांडताना सांगितले, खाण खात्याने चिरेखाणी झालेल्या जमीन मालकाला तसेच ज्याने चिऱ्यांचे उत्खनन केले आहे. त्यांना कारणेदाखवा नोटिस बजावून सुनावणी सुरू केली आहे.

चिऱ्यांची विक्री याबाबतही चौकशी सुरू असल्याने त्यासाठी किमान 3 आठवड्याची चिरेखाणीला जबाबदार असलेले खाण व भूगर्भ तसेच पोलिस यांच्याविरुद्धच्या कारवाईचा अहवाल सादर करण्यास 4 आठवड्याची मुदत देण्याच्या केलेल्या विनंतीला न्यायालयाने मान्यता दिली.

84 लाखांचे चिरे

बेकायदेशीर चिरेखाणीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपास करून पोलिसांनी भुपल प्रभुदेसाई, नागराज मल्लप्पा तसेच समीर फळदेसाई या तिघांविरुद्ध भादंसंच्या कलम 379 (चोरी) तसेच किरकोळ खनिज कायद्याच्या कलम 4(1) व 4(1अ) खाली न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. बेकायदा चिरेखाणी प्रकरणी सुमारे 84 लाख किंमतीच्या चिऱ्यांची विक्री झाल्याचे खाण खात्याने नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT