Mayor Damodar shirodkar: मडगावच्या नगराध्यक्षपदी 'दामोदर शिरोडकर' बिनविरोध

पीठासीन अधिकारी विलास गावणेकर यांनी यासंबंधी औपचारिक घोषणा आज केली.
Damodar shirodkar
Damodar shirodkarDainik Gomantak

Margao Mayor Election: अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मडगाव नगरपालिका (Margao Municipality) नगराध्यक्षपदाचा तिढा अखेर सुटला आहे. नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या दामोदर शिरोडकर (BJP Candidate Damodar shirodkar) यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. पीठासीन अधिकारी विलास गावणेकर यांनी यासंबंधी औपचारिक घोषणा आज केली.

(Damodar shirodkar declared as unopposed elected chairperson of margao municipality by presiding officer Vilas Gavnekar)

Damodar shirodkar
MIG29 Fighter Jet Crash: गोव्यात लढाऊ विमानाचा तांत्रिक बिघाडामुळे अपघात

नगराध्यक्ष निवडण्यासाठी आज निवडणूक पार पडली. विरोधी गटाने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने त्यांनी आपला उमेदवार दिला नाही. यापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीत दामोदर शिरोडकर यांना गोवा फॉरवर्डचे उमेदवार घनःश्याम शिरोडकर यांच्या कडून 15 विरुध्द 10 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी मात्र दामोदर शिरोडकर हे बिनविरोध नराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

दामोदर शिरोडकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नुकतेच भाजपात दाखल झालेले दिगंबर कामत यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, उपनगराध्यक्षपदाबाबत अद्याप काही निर्णय झाला नाही. सर्वांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे कामत म्हणाले.

Damodar shirodkar
Govind Gaude : गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून वगळा

पूर्वी सारखा दगाफटाका होऊ नये म्हणून आधीच घेतली काळजी

यापूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपच्याच 5 नगरसेवकांनी दामोदर शिरोडकर यांच्या विरोधात मतदान केले होते. याचा फटका बसल्यानंतर जागृक झालेल्या भाजपने पुन्हा अशी बंडाळी होऊ नये म्हणून भाजपच्या 17 ही नगरसेवकांना बेतालभाटी येथील तारांकित हॉटेलमध्ये हलवले होते. समोर विरोधक नसल्याने दामोदर शिरोडकर बिनविरोध निवडून आले आणि भाजपचा जीव भांड्यात पडल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com