Honey Trap Dainik Gomantak
गोवा

Goa Honey Trap Case: ‘हनी ट्रॅप’ प्रकरणी उद्योजकाला दिलासा! हायकोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश

Panjim News: संशयित ठरविलेल्या उद्योजकाला मिळाला दिलासा

गोमन्तक डिजिटल टीम

गुजरात येथील उद्योजक अनंत तन्ना याला ‘हॅनी ट्रॅप’मध्ये अडकवून त्याच्याविरुद्ध बलात्काराची पीडितेने तक्रार दाखल केली होती. महिला पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सत्र न्यायालयाने अनंत तन्ना याच्याविरुद्ध आरोप निश्‍चित करण्याचा दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरविला. त्यामुळे या संशयित ठरविलेल्या उद्योजकाला दिलासा मिळाला आहे.

सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केल्यानंतर महिला पोलिसांनी आणखी तपास केला होता, त्यात पीडित तरुणीने केलेली तक्रार पुरवणी आरोपपत्रात प्रकरण बंद करण्याच्या पोलिसांनी सादर केलेल्या मुद्यावर पुनर्विचार करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत. पीडितेने खोट्या माहितीद्वारे तक्रार दाखल केल्याने संशयिताला या पीडितेविरुद्ध तक्रार दाखल करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे.

गुजरातचा उद्योजक अनंत तन्ना याच्यावर कच्छ येथील एका तरुणीला मॉडेलसाठी गोव्यात आणून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. तिने त्यासंदर्भात तक्रार पणजी महिला पोलिस स्थानकात दाखल केली होती. या प्रकरणाच्या चौकशीअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अशाच प्रकारची तक्रार यी पीडितेने गोव्याबाहेर दाखल केली होती. त्यामुळे तिच्या या तक्रारीसंदर्भात संशय आला होता.

संशयित ‘हॅनी ट्रॅप’चा बळी ठरू शकतो अशी शंका आल्याने आणखी तपास करण्यात आला. यामध्ये हा उद्योजकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून भरमसाट रक्कम वसूल करण्याचा हा प्रकार होता हे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपपत्रावर सुनावणी घेऊन आरोप निश्‍चित करू नये व बी सारांश अतिरिक्त पुरवणीनुसार हे प्रकरण बंद करण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने ही विनंती फेटाळून आरोप निश्‍चितीचा आदेश जारी केला होता. याविरुद्ध अनंत तन्ना याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

SCROLL FOR NEXT