Anmod Ghat | Goa Belgaum Road Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! वाहनांवरील बंदी वाढणार, दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू; लॉरी व ट्रकचालक नाराज

Goa Belgaum Anmod Road: मुसळधार पावसामुळे २ जुलै रोजी अनमोड घाटात राष्ट्रीय महामार्ग कोसळला होता. त्यानंतर दोन महिन्यांसाठी अवजड वाहनांना या रस्त्यावर बंदी घालण्यात आली होती.

Sameer Panditrao

फोंडा: अनमोड राष्ट्रीय महामार्ग कोसळून आज दोन महिने पूर्ण झाले. परंतु दुरुस्तीचे काम अद्याप संथगतीने सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अवजड वाहनांवरील बंदी आणखी दोन महिने वाढवावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून नवीन अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे २ जुलै रोजी अनमोड घाटात राष्ट्रीय महामार्ग कोसळला होता. त्यानंतर दोन महिन्यांसाठी अवजड वाहनांना या रस्त्यावर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा बंदी वाढवण्याची मागणी होत असल्याने लॉरी व ट्रकचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अनमोड घाट विभागात काम सुरू आहे. पण सततचा पाऊस, लहरी हवामान आणि प्रतिकूल साईट परिस्थितीमुळे कामाला गती मिळू शकलेली नाही. त्यामुळे काम पूर्ण व्हायला आणखी दोन महिने लागतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सत्येंद्र भोबे यांनी सांगितले.

वाहनचालकांचा संताप व पोलिसांवर आरोप

अवजड वाहनचालकांचे म्हणणे आहे की, येल्लापूर-कंवर रस्त्यावरील डायव्हर्जन व्यवहार्य नाही. त्यातून इंधन खर्च, देखभाल खर्च वाढला असून व्यवसायात मोठे नुकसान होत आहे. लॉरी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत च्यारी यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला की, रात्रीच्या वेळी काही पोलिस वाहनचालकांकडून पैसे उकळतात. तशी तक्रारही संघटनेकडे आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT